E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
पावसाच्या लहरीवर बाजरीचे उत्पादन; पूर्व भागात पीक फुलोर्यात
Samruddhi Dhayagude
02 Sep 2026
मंचर, (वार्ताहर) : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात यंदा सुरुवातीच्या टप्प्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे वेळेवर पेरणी केलेल्या शेतकर्यांच्या शेतातील बाजरीचे पीक सध्या फुलोर्यात आले आहे. पिकाला योग्य वेळी पाऊस आणि पाणी मिळाल्याने दाणे भरण्याची प्रक्रिया चांगली होऊन उत्पादन समाधानकारक मिळेल, अशी अपेक्षा शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, उशिरा पेरणी झालेल्या शेतकर्यांच्या शेतातील बाजरी अजूनही लहान अवस्थेत आहे. त्यांना मात्र पावसाची आवश्यकता आहे.
लाखनगाव, काठापूर, पोंदेवाडी, देवगाव इत्यादी परिसरात बाजरीचे मोठ्या प्रमाणावर पीक घेतले जाते.काठापूर, पोंदेवाडी, लाखनगाव आणि देवगाव परिसरात वेळेवर पेरणी झालेली बाजरी सध्या फुलोर्यात आली असून, काही ठिकाणी दाणे भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकर्यांना चांगल्या उत्पादनाची आशा आहे.
दरम्यान, लोणी-धामणी परिसरात उशिरा पेरणी झाल्याने बाजरीचे पीक अद्याप लहान अवस्थेत आहे. सध्या पावसाने काहीशी ओढ दिल्याने या पिकाला पाण्याची गरज निर्माण झाली आहे. पुढील काळात पाऊस झाल्यास उत्पादनाला आधार मिळणार असून, पावसाअभावी कोरडवाहू बाजरीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
Related
Articles
मध्यप्रदेशातील सहा महिला चोरट्यांची टोळी पकडली
02 Sep 2026
नात्यांची श्रीमंती ठरली जीवनदायिनी! पतीने पत्नीला, आईने मुलाला दिली किडनी
01 Sep 2026
शालेय पोषण आहारातील वाटाण्याला कीड
04 Sep 2026
लक्ष्य सेनकडे भारतीय आव्हानाची धुरा
01 Sep 2026
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
02 Sep 2026
पौराणिक देखाव्यांनी सजणार यंदाचा गणेशोत्सव
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?