E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
पाटस टोलनाक्यावर ओबीसी बचाव
Samruddhi Dhayagude
02 Sep 2026
आंदोलकांचा ठिय्या; महामार्गावर वाहनांच्या रांगा
दौंड, (वार्ताहर) : ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने निघालेला ‘ओबीसी बचाव मोर्चा’ मंगळवारी पाटस टोलनाका येथे पोलिसांनी रोखल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मोर्चाला परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांनी बॅरिकेडिंग करून आंदोलकांना पुढे जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर आंदोलकांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरच ठिय्या देत आंदोलन सुरू केले. या प्रकारामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक वादही झाला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. राज्यातील ओबीसी आरक्षणात होणारी घुसखोरी रोखावी, तसेच बोगस व बनावट ओबीसी जात प्रमाणपत्रे रद्द करावीत, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलक मुंबईकडे रवाना झाले होते. सकाळी पाटस येथील राजमाता अहिल्याबाई होळकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर मोर्चेकरी पाटस टोलनाक्यावर दाखल झाले.
मुंबईच्या दिशेने पुढे जाण्याचा आंदोलकांनी प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना अडवले. मोर्चाला आवश्यक परवानगी नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, आंदोलकांनी मुंबईकडे जाण्याचा निर्धार कायम ठेवला. यावेळी पोलिस अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये काही काळ जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. परिस्थिती चिघळू नये यासाठी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधिक्षक बिरादार, विभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब दडस, यवत चे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर आणि त्यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळी उपस्थित राहून लक्ष्मण हाके आणि आंदोलकांशी चर्चा केली. मात्र, आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आंदोलन सुरूच राहिले.
आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या दिल्याने पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. पाटस-दौंड-अष्टविनायक मार्गावरही वाहनांची गर्दी झाली. अनेक वाहने बराच वेळ अडकून पडल्याने प्रवाशांना आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान, आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस प्रशासनाकडून आंदोलकांची समजूत काढण्यासाठी वारंवार चर्चा करण्यात आली.
चर्चेनंतर मार्ग मोकळा
तब्बल तीन ते साडेतीन तासांच्या ठिय्यानंतर पोलिस प्रशासन आणि लक्ष्मण हाके यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर मोर्चाला पुढे जाण्यास सशर्त परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे. आंदोलकांनी मार्ग मोकळा केल्यानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. पाटसवरून निघालेला मोर्चा सायंकाळी साडे सहा वाजता केडगाव चौफुला येथे दाखल झाला.
या आंदोलनामुळे पाटस टोलनाका परिसराला काही काळ पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. आमचा मोर्चा शांततेच्या मार्गाने आहे. ओबीसींच्या आरक्षणाचे संरक्षण आणि बोगस जात प्रमाणपत्रांवर कारवाई ही आमची भूमिका आहे. आम्हाला अडवले तरी ओबीसींचा आवाज मुंबईपर्यंत पोहोचवणार, अशी भूमिका लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली.
Related
Articles
निवडणूक कामकाजाचा कर संकलन विभागाला फटका; मालमत्ता कराच्या सेवांना विलंब
02 Sep 2026
श्रीलंकेचा इंडोनेशियावर 75 धावांनी विजय
04 Sep 2026
नीट-पीजीच्या फेरपरीक्षेचा जनहित अर्ज फेटाळला
04 Sep 2026
नेपाळ-तिबेटमध्ये महाराष्ट्रातील २६२ नागरिक परतीच्या प्रतीक्षेत
01 Sep 2026
‘अॅपल’च्या कर्मचार्यांवर बेरोजगारीची कुर्हाड
01 Sep 2026
डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे निधन
30 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?