E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
चायना मास्टर्समध्ये उन्नती हुडाचा पराभव; हरिहरन-अर्जुनची सामन्यातून माघार
Wrutuja pandharpure
02 Sep 2026
शेन्झेन
: चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताला निराशाजनक सुरुवात झाली. महिला एकेरीत भारताची उन्नती हुडा हिला दक्षिण कोरियाच्या किम गा-यूनकडून पराभव पत्करावा लागला. तसेच पुरुष दुहेरीत हरिहरन आमसाकरुणन आणि एम. आर. अर्जुन यांच्या जोडीने पहिल्याच गेममध्ये सामन्यातून माघार घेतली. जागतिक क्रमवारीत 25व्या क्रमांकावर असलेल्या उन्नतीला 12व्या क्रमांकावरील किमने 21-10, 21-18 असे पराभूत केले. पहिल्या गेममध्ये किमने 4-0 अशी आघाडी घेतली आणि त्यानंतर 11-3 अशी मजबूत स्थिती निर्माण केली. उन्नतीला लय सापडली नाही आणि किमने पहिला गेम सहज जिंकला.
दुसर्या गेममध्ये मात्र उन्नतीने चांगली झुंज दिली. तिने 8-7 आणि 14-13 अशी आघाडी घेत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्कोअर 18-18 असा बरोबरीत आला. मात्र निर्णायक क्षणी किमने सलग तीन गुण मिळवत सामना जिंकला.पुरुष दुहेरीत हरिहरन आणि अर्जुन यांचा सामना चीनच्या चेन बो यांग आणि लिऊ यी यांच्याशी होता. भारतीय जोडी पहिल्या गेममध्ये 8-11 अशी पिछाडीवर असताना त्यांनी माघार घेतली. माघारीचे कारण अधिकृतपणे स्पष्ट झाले नसले तरी ते तंदुरुस्तीशी संबंधित असल्याचे मानले जात आहे.आज भारताचे सात सामने होणार असून लक्ष्य सेन आणि किदाम्बी श्रीकांत यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष राहणार आहे.
Related
Articles
‘छात्रों की गूँज’मुळे भाजपला धडकी
01 Sep 2026
जनसंपर्काने जीडीपी चमकेल पण, अर्थव्यवस्था नाही
02 Sep 2026
लखनौत भाजप खासदाराच्या घराजवळचा रस्ता खचला
03 Sep 2026
प्रत्येकाने जबाबदारीने वागावे अशी अपेक्षा
01 Sep 2026
फेडररचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश
31 Aug 2026
श्रीमंती आणि विषमता
30 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?