E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
02 Sep 2026
डॉक्टरविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
बार्शी, (वार्ताहर) : वैद्यकीय उपचारांमधील निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणामुळे ३१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात डॉक्टरविरुद्ध सदोष मनुष्यवधासह विविध वैद्यकीय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी येथील सोलापूर रोडवरील बगले चाळ येथे राहणारे तक्रारदार उमेश हरीभाऊ महानवर (वय ३५) यांनी आपली पत्नी सोनम उमेश महानवर (वय ३१) हिला दुसर्या प्रसूतीसाठी १ जानेवारी २०२४ रोजी बार्शीतील परांडा रोडवर असलेल्या ’भोसले हॉस्पिटल’मध्ये दाखल केले होते.
यावेळी हॉस्पिटलचे डॉ. रविकिरण भोसले यांनी सोनम यांची पुन्हा सिझेरियन शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगितले. सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याची कायदेशीर पदवी आणि पुरेशी पात्रता नसतानाही, आपल्या कृत्यामुळे रुग्णाचा जीव जाऊ शकतो याची जाणीव असूनही डॉ. रविकिरण भोसले यांनी निष्काळजीपणे शस्त्रक्रिया केली. उपचारादरम्यान महिलेची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी आधार हॉस्पिटल सोलापूर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना सोनम महानवर यांचा ७ जानेवारी २०२४ रोजी मृत्यू झाला.
या प्रकरणी शासकीय वैद्यकीय अधिक्षक, सिव्हिल रुग्णालय सोलापूर यांच्याकडून वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर, बार्शी शहर पोलिसांनी १ सप्टेंबर रोजी डॉ. रविकिरण भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक झालटे करत आहेत.
Related
Articles
तीन भारतीय कंपन्यांवर हेरगिरीचा आरोप
11 Sep 2026
जप्त केलेल्या ४४ वाहनांचा १६ सप्टेंबरला ई-लिलाव
10 Sep 2026
बंगालमध्ये २५२ मदरसे बंद करण्याचे आदेश
14 Sep 2026
एआयने ८८ तासांत सोडवली १८१ वर्षांची गणिती समस्या?
11 Sep 2026
मान्सूनोत्तर हंगामात तीन चक्रीवादळांची शक्यता
12 Sep 2026
अनिवासी भारतीय दाम्पत्याची अमेरिकन विद्यापीठाला १९० कोटींची देणगी
11 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
2
दीर्घकाल विभक्त जोडप्यांचे घटस्फोट योग्यच
3
जीवन उन्नत बनवणारे शिक्षण हवे
4
बांगला देशी महिलांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची भरपाई देण्याचे आदेश
5
विद्यार्थ्यांचा आक्रोश (अग्रलेख)
6
निराधार मुलांना सरकारचा आधार