E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
आशियाई खेळांसाठी भारतीय खेळाडूंचा ‘स्मार्ट ट्रॅक’वर जोरदार सराव
Wrutuja pandharpure
02 Sep 2026
नवी दिल्ली
: आशियाई खेळ 2026 जवळ येत असताना भारतीय ट्रॅक आणि फील्ड खेळाडूंनी तयारीला जोरदार सुरूवात केली आहे. बंगळूरु येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रातील विशेष ‘स्मार्ट ट्रॅक’वर आठ भारतीय खेळाडू सराव करत आहेत. हे शिबिर 8 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून, त्याला ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम’ अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे.
या शिबिरात स्टीपलचेसपटू अविनाश साबळे, लांब पल्ल्याची धावपटू पारुल चौधरी, 800 मीटर धावपटू कृष्ण कुमार, डेकॅथलॉनपटू तौफिक एन, उंच उडीपटू आदर्श राम आणि सुप्रिया बी तसेच रेस वॉकर्स मंजू राणी आणि प्रियांका यांचा समावेश आहे.आयची-नागोया, जपान येथे 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान आशियाई खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
2024 मध्ये स्थापित करण्यात आलेल्या ‘स्मार्ट ट्रॅक’वर सराव करताना खेळाडूंच्या वेगाची, स्प्लिट टायमिंगची, एकूण वेळेची आणि पावलांच्या लांबीची माहिती रिअल-टाइममध्ये मिळते. ट्रॅकवरील सरळ आणि वळणदार भागांमध्ये टायमिंग गेट्स बसवण्यात आले आहेत.साई प्रशिक्षक सुरेश कुमार यांच्या मते, भारतातील हा अशा प्रकारचा पहिलाच ट्रॅक असून, त्याच्या मदतीने प्रशिक्षकांना खेळाडूंच्या कामगिरीचे अचूक विश्लेषण करता येते. संबंधित अॅपच्या माध्यमातून मिळालेली माहिती नंतरही अभ्यासता येत असल्याने प्रशिक्षण अधिक प्रभावी होत आहे.
Related
Articles
सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीला मुदतवाढ देण्याचा निर्णय
02 Sep 2026
श्रीलंकेने महिला चॅम्पियन्स चषकाचे यजमानपद गमावले
31 Aug 2026
सेबीचे सीएएस की तकेशीचा कॅसल?
31 Aug 2026
जीएसटी संकलन घटले
02 Sep 2026
गणेशोत्सवाच्या परंपरेचा काँग्रेसला अभिमान
31 Aug 2026
धमकीच्या घोषणा दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करु
30 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?