E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
मेस्सीच्या निवृत्तीने चाहते भावूक; आठवणींचा प्रवास पुन्हा चर्चेत
Wrutuja pandharpure
02 Sep 2026
कोलकाता
: अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर कोलकात्यातील चाहत्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. मेस्सीचे या शहराशी असलेले नाते केवळ फुटबॉल सामन्यापुरते मर्यादित नसून गेल्या 15 वर्षांत ते अधिक घट्ट झाले आहे.2 सप्टेंबर 2011 रोजी मेस्सीने सॉल्ट लेक स्टेडियमवर अर्जेंटिनाचा कर्णधार म्हणून प्रथम पाऊल ठेवले होते. अर्जेंटिना आणि व्हेनेझुएला यांच्यातील त्या मैत्रीपूर्ण सामन्यापासून कोलकात्याच्या चाहत्यांमध्ये मेस्सीबद्दल विशेष आकर्षण निर्माण झाले. त्याच्यापूर्वी पेले आणि दिएगो मॅराडोना यांसारख्या दिग्गजांनीही या शहराच्या फुटबॉलप्रेमाचा अनुभव घेतला होता.
मेस्सीचा चाहता सौमिंद्र घोष याने आपल्या आवडीचे रूपांतर व्यवसायात करत ‘डम डम लिओ कॅफे’ सुरू केले. गेल्या वर्षी मेस्सीच्या भारत दौर्यादरम्यान घोषला त्याची भेट घेण्याची संधीही मिळाली.मात्र 13 डिसेंबर 2025 रोजी मेस्सीच्या कोलकाता दौर्यात घडलेला गोंधळ चाहत्यांसाठी कटू आठवण ठरला. मेस्सीला पाहण्यासाठी हजारो चाहते स्टेडियममध्ये जमले होते. मात्र सुरक्षा व्यवस्थेमुळे त्याला अल्पावधीत मैदानातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर संतप्त चाहत्यांनी स्टेडियममध्ये तोडफोड केली.आता मेस्सीच्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीमुळे कोलकात्याच्या चाहत्यांना त्याच्या अर्जेंटिनाच्या जर्सीतील अखेरच्या पर्वाची हुरहूर लागली आहे.
Related
Articles
महाप्रसादाच्या ठिकाणांचीही तपासणी होणार
04 Sep 2026
राज्यात भाजपला खडसेंनी उभे केले : पवार
30 Aug 2026
पेट्रोल निर्यातीत वाढ
31 Aug 2026
‘एल निनो’चा पर्जन्यमान आणि तपमानावर मोठा परिणाम
04 Sep 2026
बाळासाहेबांची पक्ष घटना उद्धव यांनीच बदलली
03 Sep 2026
जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात सर्वपक्षीय सदस्यांचे आंदोलन
01 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?