E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
बेन स्टोक्स आता ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅशमध्ये दिसणार; अॅडलेड स्ट्रायकर्सकडून करार
Wrutuja pandharpure
02 Sep 2026
मेलबर्न
: इंग्लंडचा माजी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स आता ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. अॅडलेड स्ट्रायकर्सने स्टोक्सला आपल्या संघात स्थान दिले असून, नव्या थेट करार पद्धतीअंतर्गत करारबद्ध होणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, स्टोक्ससाठी अॅडलेड स्ट्रायकर्सने सुमारे 5 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर खर्च केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे स्टोक्स संपूर्ण बिग बॅश हंगामासाठी उपलब्ध राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी तो 2014-15च्या हंगामात मेलबर्न रेनेगेड्सकडून बिग बॅशमध्ये खेळला होता.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि स्ट्रायकर्सशी संबंधित टीम पेनने स्टोक्सचे संघात स्वागत केले. दबावाच्या परिस्थितीत सर्वोत्तम कामगिरी करण्याची स्टोक्सची क्षमता संघासाठी महत्त्वाची ठरेल, असे पेनने म्हटले आहे. स्टोक्सनेही अॅडलेड स्ट्रायकर्सकडून खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले. अॅडलेड ओव्हल हे क्रिकेटसाठी शानदार मैदान असून, संघाच्या विजयात आपले पूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्याने स्पष्ट केले.स्टोक्सने इंग्लंडकडून 122 कसोटी, 114 एकदिवसीय आणि 43 टी-20 सामने खेळले आहेत. 2022च्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने नाबाद 52 धावांची खेळी करत इंग्लंडला विजेतेपद मिळवून दिले होते. आयपीएलमध्येही स्टोक्स राजस्थान रॉयल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला आहे.
Related
Articles
महाभूमी स्टॅक.... एका क्लिकवर मिळणार जमिनीचा सर्च रिपोर्ट
02 Sep 2026
शाडूच्या गणेशमूर्तींना भक्तांची पसंती
02 Sep 2026
इराण-अमेरिकेत पुन्हा संघर्ष
01 Sep 2026
कासारवाडी, फुगेवाडीतील नागरिकांची गैरसोय दूर होणार, रेल्वे गेटऐवजी भुयारी मार्ग उभारणार
04 Sep 2026
शेवगाव तालुक्यात पावसाची दडी; खरीप धोक्यात
01 Sep 2026
‘बल्क वेस्ट जनरेटर्स’ची माहिती अॅपद्वारे एका क्लिकवर
03 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?