E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज
Wrutuja pandharpure
28 Aug 2026
पुणे
: कोकण व लगतच्या पूर्व मध्य समुद्रावर समुद्र सपाटीपासून 5.8 कि.मी. उंचीवर असलेली वार्याची चक्रकार स्थिती कायम आहे. आज (शुक्रवारी) कोकण, गोव्यात बर्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. विदर्भात बर्याच ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वार्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. राज्यातील पुढील दोन दिवसांत कमाल व किमान तपमानात फारसा बदल होणार नाही. त्यानंतर मात्र कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात कमाल तपमानात 1 ते 2 अंशाने वाढ होण्याची शक्ता आहे. पुणे व परिसरात आज आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारनंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.
मागील 24 तासात मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. या पावसामुळे विशेषत: विदर्भ, मराठवाड्यातील विविध प्रकारच्या पीकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर मराठवाड्यातील काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तर काही भागात पण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत मात्र पावसाचे सातत्य कायम आहे. त्यामुळे त्या भागातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रांत बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागातील बहुतांश धरणे भरली आहेत. तलावली भरले आहेत. या भागातील नद्यांना पाणी वाहत आहे. पुढील दोन ते चार दिवस ढगाळ वातावरणासह पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पुण्यात पावसाच्या सरी
शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. गुरूवारी सकाळपासून शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यानंतर दुपारी ऊन पडले होते. पुन्हा सायंकाळी ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पावसामुळे हवेत काही काळ गारवा पसरला होता. रात्री उशीरापर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. आजही शहरात ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज आहे.
घाट माथ्यावर पावसाचे सातत्य
राज्यातील घाट माथ्यावर पावसाचे सातत्य कायम आहे. आज (शुक्रवारी) घाट विभागात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. लोणावळा, खंडाळा, दापोली, शिरोटा, अंबोणे, खोपोली, ताम्हिणी, भीरा, शिरगाव, भीवपूरी, ठाकूरवाडी आदी घाट विभागात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. पुढील दोन दिवस या भागात पाऊस कायम असणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
Related
Articles
नेत्रदानातून दाखवा दृष्टीहीनांना प्रकाशाचा किरण
02 Sep 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करावी : शामकांत शेंडगे
01 Sep 2026
भारत, उझबेकिस्तान संरक्षण भागीदारी वाढविण्याचा प्रयत्न
31 Aug 2026
’डीजे’विरूद्ध नागरिकांचा संताप
31 Aug 2026
पाटस टोलनाक्यावर ओबीसी बचाव
02 Sep 2026
पूर्व झोन दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीत
02 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?