E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
बनावट व चुकीची कागदपत्रे सादर केल्यास प्रवेश रद्द होणार
Wrutuja pandharpure
05 Aug 2026
सीईटी कक्षाचा निर्णय
पुणे
: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी सध्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. या प्रवेश प्रक्रियेमध्ये तपासणी दरम्यान किंवा पडताळणीअंती सादर केलेली कागदपत्रे चुकीची, खोटी, बनावट किंवा दिशाभूल करणारी आढळल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश तात्काळ रद्द करण्यात येईल. तसेच संबंधित विद्यार्थ्याविरुद्ध प्रचलित नियमांनुसार आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा निर्णय सीईटी कक्षाने घेऊन तशा स्वरूपाचे निर्देश सर्व संस्थाना दिले आहेत.
सदर केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना विविध आरक्षण प्रवर्गांअंतर्गत, संरक्षण दल, दिव्यांग, अल्पसंख्याक लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेली आहेत. सदर कागदपत्रांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून महाविद्यालयांमध्ये जागांचे वाटप करण्यात येत आहे.या अनुषंगाने जर संबंधित आरक्षणाचा लाभ मिळविण्यासाठी सादर केलेली कागदपत्रे तपासणीदरम्यान अथवा कोणत्याही पडताळणीअंती चुकीची, खोटी, बनावट किंवा दिशाभूल करणारी आढळल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश तात्काळ रद्द करण्यात येईल. तसेच संबंधित विद्यार्थ्याविरुद्ध प्रचलित नियमांनुसार आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही होईल.
प्रवेश देणार्या संबंधित संस्थेने जागा वाटप झालेल्या विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित करण्यापूर्वी संबंधित विद्यार्थ्यांकडील सर्व मूळ कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करूनच प्रवेश निश्चित करावा. कागदपत्रांची योग्य पडताळणी न करता प्रवेश निश्चित केला आहे असे सिद्ध झाल्यास अशा संस्थावर देखील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे निर्देश संबंधित संस्थांना सीईटी कक्षानी दिले आहेत. यामुळे प्रवेश घेणारे विद्यार्थी व प्रवेश देणार्या संस्थांनी वरील निर्देशानुसारच प्रवेश प्रक्रियेची आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना सीईटी कक्षानी दिल्या आहेत.
Related
Articles
अनधिकृत व्यवस्था शहरास बाधक, समाजास घातक
13 Aug 2026
’शिवरत्न सभागृह’चे नाव बदलून ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह’
14 Aug 2026
खडकवासल्यात जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी सीडब्ल्यूपीआरएसची जागा उपलब्ध होणार
13 Aug 2026
लष्करी श्वान ’टायसन’चा गौरव
17 Aug 2026
श्रीलंकेच्या नौदलाकडून नऊ भारतीय मच्छीमारांना अटक
14 Aug 2026
बाजारात टोमॅटोचा सुकाळ
12 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा