होर्मुझमध्ये जहाजावर क्षेपणास्त्र आदळले   

कैरो : होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणार्‍या एका व्यापारी जहाजावर ओमानजवळ रात्री एक क्षेपणास्त्र आदळले. दरम्यान, चर्चेबाबत अमेरिका आणि इराणने परस्पर विरोधी दावे केले आहेत.
 
मंगळवारी पहाटे २ वाजता व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र आदळले होते, अशी माहिती ब्रिटनच्या सागरी व्यापार कृती केंद्राच्या वतीने देेण्यात आली. ओमानजवळील अल खासब परिसरात जहाज असताना क्षेपणास्त्र आदळले होते. अरेबियन द्विपकल्पाच्या टोकावर अल खासब शहर वसले आहे. ते होर्मुझजवळच आहे. येथून जगातील खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची पाचवी मोठी जलवाहतूक केली जाते.  

चर्चेबाबत उलट-सुलट विधाने

डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, युद्ध थांबविण्यााठी दोन्ही देश पुन्हा चर्चा सुरू करत आहेत. या उलट इराणने सांगितले की, आम्ही फक्त ओमानसोबत चर्चा करत असून चर्चेचा भर केवळ होर्मुझची सामुद्रधुनीवर आहे.  
 

Related Articles