E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
चर्चेसाठी शांतता मंडळाच्या प्रतिनिधीने घेतली नेतन्याहू यांची भेट
Samruddhi Dhayagude
05 Aug 2026
गाझामधील निःशस्त्रीकरण करार
हल्ले थांबवण्याचे आवाहन
जेरुसलेम : गाझामधील युद्धोत्तर घडामोडींवर देखरेख करणार्या शांतता मंडळाच्या एका अधिकार्याने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतली. एका निवेदनानुसार, या बैठकीत इतर मुद्द्यांबरोबरच, शांतता मंडळाने हमाससोबत केलेल्या चर्चेदरम्यान झालेल्या नवीन निःशस्त्रीकरण करारावर चर्चा केली.
शांतता मंडळाने एका निवेदनात म्हटले आहे की, गाझासाठीचे उच्च प्रतिनिधी निकोलाय म्लादेनोव्ह यांनी पंतप्रधान आणि त्यांच्या टीमसोबत रचनात्मक आणि सविस्तर चर्चा केली. आमचे ध्येय गाझा पट्टीत संपूर्ण निःशस्त्रीकरण आणि बंदुकीच्या राजवटीऐवजी नागरी प्रशासनाची स्थापना करणे हे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
या बैठकीशी संबंधित व्यक्तींच्या मते, म्लादेनोव्ह यांनी नेतान्याहू यांना गाझा पट्टीत इस्रायलचे हल्ले थांबवण्याची विनंती केली. हमासची शस्त्रे निष्क्रिय करण्याच्या कराराला पुढे नेण्यासाठी म्लादेनोव्ह आणि त्यांची टीम इस्रायलवर गाझामधील हल्ले थांबवण्यासाठी दबाव आणत आहेत. म्लादेनोव्ह यांच्या टीममध्ये वरिष्ठ सल्लागार आर्य लाइटस्टोन यांचा समावेश आहे. हमासने एका निवेदनात म्हटले आहे की, ते आणि विविध पॅलेस्टिनी गट शस्त्रास्त्र कराराच्या दुसर्या टप्प्याच्या अंमलबजावणीसाठी झालेल्या करारास वचनबद्ध आहेत, ज्यामध्ये सर्व पक्षांच्या जबाबदार्यांचा समावेश आहे.
Related
Articles
गोंधळ थांबवा (अग्रलेख)
12 Aug 2026
अकोला-इंदूर चोरटा व्यापार
17 Aug 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात 13 नव्या महाविद्यालयांना मंजुरी
17 Aug 2026
होर्मुझ सामुद्रधुनी अनिश्चित काळासाठी बंद करू
15 Aug 2026
राज्यातील ३६ हजार कंपन्यांना टाळे
13 Aug 2026
अनधिकृत व्यवस्था शहरास बाधक, समाजास घातक
13 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा