E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुण्यात रिक्षा प्रवास सप्टेंबरमध्ये महागणार
Wrutuja pandharpure
05 Aug 2026
किमान भाडे 30 रुपये होणार
पुणे
: पुणेकरांना येत्या 1 सप्टेंबरपासून रिक्षा प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (आरटीए) बैठकीत रिक्षा भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली असून, किमान भाडे 25 रुपयांवरून 30 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पहिल्या दीड किलोमीटरनंतर प्रत्येक अतिरिक्त किलोमीटरसाठी आकारले जाणारे भाडे 17 रुपयांवरून 20 रुपये करण्यात येणार आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील वाढती महागाई, सीएनजीच्या किमतीतील सातत्याने होत असलेली वाढ आणि वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचा वाढलेला खर्च लक्षात घेऊन रिक्षाचालक संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरटीएच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली आणि दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.
सध्या पुण्यात पहिल्या दीड किलोमीटरसाठी 25 रुपये किमान भाडे आकारले जाते. नव्या निर्णयानुसार ते 30 रुपये होईल. त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त किलोमीटरसाठीचा दर 17 रुपयांऐवजी 20 रुपये आकारला जाईल. ही नवीन दररचना 1 सप्टेंबरपासून संपूर्ण पुणे जिल्ह्यात लागू करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, नवीन भाडेदर लागू होण्यापूर्वी सर्व रिक्षाचालकांना आपल्या वाहनांच्या मीटरचे रिकॅलिब्रेशन करून घेणे आवश्यक राहणार आहे. मीटर अद्ययावत झाल्यानंतरच नवीन दरानुसार भाडे आकारता येणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांवरील आर्थिक भार वाढणार असला, तरी वाढत्या खर्चामुळे अडचणीत आलेल्या रिक्षाचालकांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भाडेदरातील बदलपहिले दीड किलोमीटर : 25 रुपये - 30 रुपये
त्यानंतर प्रत्येक किलोमीटर : 17 रुपये - 20 रुपये
Related
Articles
एनटीएने ५० कर्मचार्यांना हटवले
18 Aug 2026
जेएसएससी कार्यालयात सीआयडीचे छापे
18 Aug 2026
तळेगाव ढमढेरेत मोटारीने घेतला पेट
12 Aug 2026
अभिनेत्री अनन्या राज यांचे मुंबईत निधन
18 Aug 2026
आठ लाख कोटीच्या ‘एफएमसीजी’ बाजाराचे लक्ष्य
15 Aug 2026
लष्करी श्वान ’टायसन’चा गौरव
17 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा