E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण द्या
Wrutuja pandharpure
05 Aug 2026
आमदार विक्रम काकडेंची गृहमंत्री शहा यांच्याकडे मागणी
पुणे
: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्राच्या विकासातील गेल्या चार दशकांतील योगदान पाहता यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार विक्रम काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री शाह यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.
महाराष्ट्राच्या विकासात गेली चार दशके अजित पवार यांनी अतुलनीय योगदान दिले आहे. आमदार, खासदार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याबरोबरच अजित पवार यांनी अर्थ व नियोजन, जलसंधारण, ऊर्जा, ग्रामीण विकास, कृषी आदी अनेक महत्वपूर्ण विभागात अमूल्य योगदान दिले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही अनेक लोककल्याणकारी उपक्रम व प्रकल्प राबवले गेले आहेत. त्यांची दूरदृष्टी आणि त्वरित निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे कायमच ते चर्चेत राहिले. याच कारणास्तव त्यांना जनतेचे प्रचंड प्रेम मिळाले. त्यांचे योगदान येणार्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहणार आहे.
अजित पवार यांचे कार्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करावे. केंद्र सरकारने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंती आमदार काकडे यांनी अमित शाह यांच्या भेटीदरम्यान केली आहे.या मागणीचे निवेदनही त्यांनी केंद्रीय गृहमंत्री शाह यांना दिले आहे. अजित पवार यांचे यावर्षी जानेवारी महिन्यात विमान अपघातात निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या निधनाने हळहळला होता. कामाचा माणूस आणि रोखठोक नेता म्हणून अजित पवार यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख होती.
Related
Articles
राज्यातील १० नगर पंचायती, परिषदांच्या विकास आराखड्यांना मंजुरी
13 Aug 2026
ओल्या कचर्यापासून कॉम्प्रेसड् बायोगॅस निर्मितीसाठी प्रतिटन २ हजार ९० रुपये विक्रमी दर
13 Aug 2026
वाचक लिहितात
18 Aug 2026
भारताकडे 178 धावांची आघाडी
18 Aug 2026
बाजारात टोमॅटोचा सुकाळ
12 Aug 2026
रेणावी घाटात भीषण अपघातात दोन ठार
14 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा