E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
धरणे शंभर टक्के भरली
Wrutuja pandharpure
05 Aug 2026
पुणे
: शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे पुणेकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. धरण क्षेत्रात पावसाचे सातत्य कायम आहे. त्यामुळे धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. परिणामी मागील चार दिवसांपासून मुठा नदी दुथडी वाहत आहे. आज (बुधवारी) धरण क्षेत्रात हलका पाऊस असेल. उद्या (गुरूवार) पासून धरण क्षेत्रातील पाऊस थांबणार असल्याचा अंदाज आहे.
खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांतून पुण्याला पाणी पुरवठा केला जातो. जूनमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र जुलै महिन्यात दमदार पाऊस पडला. त्यामुळे चारही धरणे शंभर टक्के भरली आहेत. विशेष म्हणजे यंदा मागील वर्षीच्या तुलनेत लवकर धरणे भरली आहेत. मागील वर्षी 25.84 टीएमसी पाणी साठले होते. त्याची टक्केवारी 88.66 इतकी होती. जुलै महिन्यात पंधरा दिवस चांगला पाऊस पडला. त्यामुळे जूनची कसरही जुलैमध्ये भरून निघाली आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही सर्वांत आधी खडकवासला धरण भरले. धरणातून पाणी सोडल्यामुळे यंदा तीन वेळा डेक्कन परिसरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. मागील चार दिवसांपासून नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच नदीपात्रात येणारे रस्ते बॅरिगेटस लावून बंद करण्यात आले आहेत. डोंगर माथ्यावर पडत असलेल्या पावसाचे पाणी धरणांत वाहून येत आहे. त्यामुळे धरणे भरली असली, तरी वाहून येणार्या पाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.
14 हजार क्युसेक पाणी सोडले
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरण शंभर टक्के भरले आहेत. त्यात धरण क्षेत्रात पाऊस सुरूच आहे. त्यामुळे मागील चार दिवसांपासून सातत्याने धरणातून पाणी सोडले जात आहे. काल सायंकाळी खडकवासला धरणातून 14 हजार 393 क्युसेक पाणी सोडण्यात आले. डोंगरावरून धरणांत वाहून येणार्या पाण्याच्या तसेच पावसाच्या प्रमाणात धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याचे खडकवासला पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
धरणांतील पाण्याची स्थिती
धरण
पाऊस
टीएमसी
टक्केवारी
खडकवासला
00 मिमी
1.97
100
पानशेत
13 मिमी
10.65
100
वरसगाव
08 मिमी
12.82
100
टेमघर
26 मिमी
3.69
99.55
एकूण
47 मिमी
29.13
99.94
Related
Articles
राज्यसेवेतील अधिकारी-कर्मचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करा
12 Aug 2026
आयुर्वेदिक औषध उत्पादन करणार्या संस्थांवर ‘एफडीए’ची कारवाई
13 Aug 2026
15 लाखांहून अधिक मतदारांची पडताळणी; नोंदींमध्ये 7.25 लाख विसंगती
18 Aug 2026
मंचर बाजार समितीत कांद्याची आवक स्थिर; बाजारभावात वाढ
12 Aug 2026
19 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
18 Aug 2026
उरुळी देवाची येथे ३०० टन क्षमतेचा बायो-सीएनजी प्रकल्प
18 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा