E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
निकालाचा अर्थ (अग्रलेख)
Wrutuja pandharpure
05 Aug 2026
पुढील वर्षी सुरुवातीलाच उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या निवडणुका होतील. ‘मास्टर स्ट्रोक’ या नावाने जनभावनेशी फारकत घेणारे निर्णय मतदारांकडून स्वीकारले जाणार नाहीत, हे पोटनिवडणुकांतील पराभवाने दाखवून दिले आहे.
भाजपचा शिखरावरील कार्यकाळ संपत आहे का? मतदारांमधील आपल्या समर्थक वर्गाला गृहीत धरणे पक्षाला पुढच्या काळात महागात पडणार का? बिहारमधील बांकीपूर आणि मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर हे प्रश्न पुढे आले. याचबरोबर बिहार आणि पर्यायाने देशाच्या राजकारणात देखील प्रशांत किशोर यांच्या रूपाने नवा पर्याय समोर आला आहे. यशस्वी राजकीय व्यूहरचनाकार म्हणून प्रशांत किशोर ऊर्फ पीके यांची ओळख होतीच; पण आता आपलीच राजकीय व्यृूहरचना वास्तवात यशस्वी करण्यात त्यांना यश आले. बिहार विधानसभेची बांकीपूरची जागा पीके यांनी तब्बल 19 हजार मतांच्या फरकाने जिंकली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या राजीनाम्यामुळे ती रिकामी झाली होती. बांकीपूर हा भाजप आणि नितीन नवीन यांचा गड. 1995 पासून प्रत्येकवेळी तेथून भाजप उमेदवाराचा विजय ठरलेला होता. स्वतः नितीन नवीन पाच वेळा बांकीपूरमधून निवडून आले. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची जागा भाजपला राखता आली नाही, याहून दारुण पराभव दुसरा असू शकत नाही. धक्कादायक म्हणजे जेथे नितीन नवीन यांचे मतदान आहे ते केंद्र आणि पीकेंविरुद्धच्या लढतीत पराभूत झालेल्या नीरजकुमार सिन्हांचे मतदान केंद्र, या दोन्ही ठिकाणी भाजप पिछाडीवर राहिला!
सम्राट चौधरी वादात
अध्यक्षाचा मतदारसंघ गमावल्याचे वैषम्य सोडाच, बांकीपूरमध्ये राष्ट्रीय जनता दल तिसर्या क्रमांकावर गेल्याची ‘आनंददायी’ प्रतिक्रिया भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दिली. वादळात वाळूमध्ये तोंड खुपसून बसणार्या शहामृहाची उपमा अशांसाठी योग्य! ‘तुम्ही नितिशकुमार यांच्यामुळे बिहारमध्ये जिंकलात‘, ही पीके यांची प्रतिक्रिया भाजपला झोंबणारी असली तरी ती वस्तुस्थिती. जन सुराज पक्षाची स्थापना करून पीके याआधीच निवडणूक रिंगणात उतरले होते; पण विधानसभा निवडणुकीत त्यांच्या अनेक उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्याने त्यांची खिल्ली उडवली गेली. बांकीपूरमधील पराभवाची जबाबदारी भाजपचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची. बिहारमध्ये आपला मुख्यमंत्री करायचा, या मानसिकतेने भाजपला पछाडले होते. नितिशकुमार यांनी बिहारची धुरा चांगली सांभाळली. सम्राट चौधरी त्यांच्या निवडीपासूनच वादात आहेत. अलीकडेच भरत तिवारी या युवकाला चकमकीत ठार करण्यात आले. या प्रकरणाने चौधरींची प्रतिमा मलीन झाली. एका कार्यकारी अभियंत्याच्या मृत्युप्रकरणी थेट चिराग पासवान यांच्यावर आरोप झाले. सम्राट चौधरी सत्तेवर येऊन फार काळ होत नाही, तोच ‘जंगल राज’ची झलक दिसण्यास सुरुवात झाल्याने भाजपचा मतदार अस्वस्थ आहे. अल्पसंख्याक घटकाने आरजेडीकडे पाठ फिरवली. प्रशांत किशोर यांनी सर्वसामान्यांना स्पर्श करणारे मुद्दे उचलले. केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची जागा निवडणे, हे प्रशांत किशोर यांचे धाडस होते. ठामपणे त्यांनी भूमिका मांडणे मतदारांना भावणारे ठरले. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे बिहारमध्ये असलेल्या नाराजीचाही फायदा त्यांना झाला. ‘मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघ काँग्रेसकडे कायम राहिला’, ही तेथील पराभवानंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिलेली प्रतिक्रिया भाजप समर्थकांचा मुखभंग करणारी आणि त्याचवेळी, पक्षाचे नेते लोकांपासून किती दूर गेले आहेत हे दाखवणारी आहे. काँग्रेसचे घनश्याम सिंग तेथून विजयी झाले. या जागेवर भाजप नेते आणि माजी गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांना लढायचे होते; पण मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याने मोहन यादव यांनी त्यांना उमेदवारी मिळू दिली नव्हती. यानंतर नरोत्तम मिश्रांच्या समर्थकांचा झालेला उद्रेक सार्या देशाने पाहिला. गुजरातचा गड अभेद्य असल्याचे भाजपने मंजलपूरची पोटनिवडणूक जिंकून दाखवून दिले असले तरी बिहार आणि मध्य प्रदेशातील पराभवामुळे तो विजय झाकोळला. पक्षाला आत्मचिंतनाची गरज आहे. ‘आपण अजिंक्य आहोत’, ही मानसिकता पक्षात सर्व स्तरात रुजली असून मतदारांनीच या मानसिकतेला उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. पोटनिवडणुकांच्या निकालाचा संदेश भाजपसाठी धोक्याचा इशारा आहे.
Related
Articles
देशापुढील आव्हाने आणि नव्या दिशा
15 Aug 2026
सेवाभरती परीक्षेत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती
13 Aug 2026
शिराळ्यात नागपंचमी उत्साहात
18 Aug 2026
पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई
15 Aug 2026
चाकणमधील उद्योजकांच्या प्रश्नावर रविवारी बैठक
14 Aug 2026
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा
13 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा