घाट माथ्यावर जोरदार पाऊस   

पुणे : घाट माथ्यावर मागील चार ते पाच दिवसांपासून जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडत आहे. शनिवारी दिवसभर घाट विभागात जोरदार पाऊस पडला. आजही घाट माथ्यावर पाऊस कायम असणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ताम्हिणी, भीरा, मुळशी, लोणावळा, खंडाळा, खोपोली, अंबोणे, शिरगाव, डुंगरवाडी, शिरोटा, कोयना आदी घाट विभागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे परिसरातील नद्यांना पूर आला आहे. ओढे ओसंडून वाहत आहेत. अतिपावसामुळे घाट विभागातील बहुतांश रस्त्यावर गाळ वाहून आला आहे. पाणीही वाहत आहे. त्यामुळे हे रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत. जोरदार पावसामुळे घाट विभागातील नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 
 
घाट माथ्यावर पडत असलेला पाऊस परिसरातील धरण परिसरात वाहून येत आहे. त्यामुळे परिसरातील धरणांतील पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. पाऊस कायम राहणार असल्यामुळे आणखी काही काळ घाटातील रस्ते वाहतूकीसाठी बंदच असणार आहेत. तर घाट विभागातील काही रस्ते पावसामुळे वाहून गेले आहेत. रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डेही पडले आहेत. जोरदार पावसामुळे घाट विभागातून पाण्यासोबत मातीही वाहून येत आहे. घाट विभागात पावसासह जोराचे वारेही वाहत आहेत. त्यामुळे झाड पडीच्या घटनाही घडत आहेत. 
 
यंदाच्या पावसाळी हंगामात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस घाट विभागात पडला आहे. त्यामुळे या भागातील पाण्याचा प्रश्‍न सुटला असून शेतीची कामेही मार्गी लागले आहेत. घाट माथ्यावरील जोरदार पावसामुळेच पुण्याला पाणी पुरवठा करणार्‍या धरण क्षेत्रातही पाणी वाढले आहे. घाट विभागात आणखी दोन दिवस पाऊस असाच राहिल्यास धरणे शंभर टक्के भरण्यास मदत होणार आहे. 
 
धरण क्षेत्रातील स्थिती 
 
धरण                  पाऊस टीएमसी टक्केवारी 
खडकवासला 18 मिमी 1.97           100
पानशेत            95 मिमी 9.43         88.54
वरसगाव          91 मिमी 10.63 82.94
टेमघर            133 मिमी 2.53         68.19
एकूण              337मिमी 24.56 84.27
 
पडलेला पाऊस 
 
ठिकाण           पाऊस
ताम्हिणी 320 मिमी
शिरगाव          300 मिमी
लोणावळा 248 मिमी
दवंडी 236 मिमी
वाळवण 233 मिमी
भीरा               232 मिमी

Related Articles