E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
लाइफस्टाइल
अखेरचा हा तुला दंडवत
Wrutuja pandharpure
24 Jul 2026
मागील लेखात एका वृद्ध जोडप्याची समस्या सांगितली होती. जुन्या दुमजली वाड्यात वरच्या मजल्यावर राहणारे सत्तरी ओलांडलेले हे जोडपे. तळमजल्यावर ऐंशी पार केलेले चुलत भाऊ-वहिनी. वरच्या मजल्यावरील जोडपे मणका आणि गुडघ्यांच्या विकाराने त्रस्त. त्यांना जिना चढणे-उतरणे दुरापास्त झाले होते. जिना चढताना गुडघे, पाठ आणि छातीत वेदना होत. वाड्याचा पुनर्विकास करायला खालच्या मजल्यावरचे जोडपे परवानगी देत नव्हते. कायदेशीर अडचणींमुळे वरचा मजला विकता येत नव्हता. भाड्याने देता येत नव्हता. वरच्या मजल्यावरचे जोडपे हैराण झाले होते. त्यांना नवे घर हवे होते; पण मार्ग मिळत नव्हता.
त्यांनी तळमजल्यावरील जोडप्याला पुन्हा पुन्हा विनंती केली. नकार मिळाला. समाजमाध्यमांवर आपली कैफियत मांडली. स्थानिक राजकीय नेत्यांना भेटले. सामाजिक कार्यकर्त्यांना भेटले. कोणी सल्ला दिला, की मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांपाशी गार्हाणे पोचवा; पण व्यर्थ. अशात एका बिल्डरने संपर्क साधला. जोडप्याने आशा सोडली होती; पण नाइलाज म्हणून त्याचे म्हणणे ऐकत राहिले. बिल्डरने त्यांना वेगळा प्रस्ताव दिला. बिल्डर वकिलाच्या साह्याने कायदेशीर मार्ग शोधून काढील. त्यासाठी लागणारा खर्च आणि सारी धावपळ करील. त्यांनी पडत्या भावात आपल्या खोल्या विकायच्या. ते पैसे घेऊन अन्यत्र छोटे घर भाड्याने घ्यायचे. बिल्डरकडून मिळालेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवले, तर पुढील पंधरा-वीस वर्षे त्या व्याजातून भाडे भरता येईल. जोडप्याने हा प्रस्ताव स्वीकारला.
पुढील काही दिवस दोघांनी सकाळी जिना उतरून बाहेर पडायचे आणि दिवसभर रिक्षात बसून सोयीचे पडणारे घर शोधायचे... हा उद्योग केला. त्यांना घर मिळाले. खालच्या मजल्यावरील जोडप्याने कायदेशीर अडचण उभी करू नये किंवा स्टे आणण्याचा प्रयास करून नये म्हणून मित्रांच्या मदतीने आणि घरी कामाला येणार्या मुलीच्या घरातील माणसांच्या मदतीने त्यांनी थोडे थोडे सामान गुप्तपणे नव्या जागेत हलवले. उर्वरित जड सामान नेण्यासाठी एके दिवशी भल्या पहाटे ट्रक ठरवला. उद्या पहाटे ट्रक येणार होता. आज शेवटची रात्र घरी स्वयंपाकाला आणि घरकामाला येणारी मुलगी रात्री त्यांच्या सोबत बराच वेळ बसली होती. तिघांना रडू आवरत नव्हते. वेळी-अवेळी कधीही दुखलं-खुपलं आणि फोन केला तर ही मुलगी धावून यायची. पेन बाम, विविध वेदनाशामक स्प्रे हाताशी आहेत ना याची खबरदारी घ्यायची. उद्यापासून ताटातूट होणार आहे. आजी-आजोबा दूर रहायला जाणार आहेत.
तिने दोघांना इथलं शेवटचं म्हणून पिठलं-भाकरी आणि मुगाच्या डाळीची खिचडी करून दिली. तिघं एकत्र जेवले. तिनं भांडी घासून आवरून शेवटची बांधाबांध करून दिली. आठवण ठेवायची म्हणून वास्तूच्या आतले खूप सारे फोटो काढले. उद्या पहाटे येते म्हणून निरोप घेतला. रात्री दोघांना झोप कशी आली नाही. इथल्या आठवणी दाटून आल्या. आजोबा जन्मल्यापासून इथंच राहिलेले. आजी देखील पन्नास वर्षांपूर्वी लग्न करून इथं आलेली. तिच्या मनाला देखील या वास्तूतल्या खूप आठवणी चिकटल्या होत्या. जिना त्रास देतो, इथं रहावंसं वाटत नाही म्हणून करवादल्याबद्दल दोघांनी पुन्हा पुन्हा त्या वास्तूची मनात क्षमा मागितली. आजीने झोप येण्यासाठी अर्धी गोळी घेतली आणि झोपेच्या आधीन झाली.
पहाटे ट्रक येण्यापूर्वी जाग यायला हवी म्हणून आजोबाने गोळी घेतली नाही. डोळे मिटायचा प्रयत्न केला. मनातल्या मनात सगळं बालपण दिसत होतं. कुठल्या तरी परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून घाबरून जिन्याखाली ठेवलेल्या धान्याच्या पोत्यांमागे लपला होता आणि पालक सर्वत्र शोधत होते. भूक अनावर झाली तेव्हा रडतरडत तो पोत्यांमागून बाहेर आला होता. उद्या जिन्याशी संबंध संपेल. आणखीन एकदा कशावरून तरी वडिलांनी मारलं होतं, आईने अबोला धरला होता. रागाने तो जेवत नव्हता. तेव्हा आजीने जवळ घेऊन त्याला भरवलं होतं. काहीबाही आठवताना आजोबांना झोप लागली. स्वप्नात झगझगीत पोशाख परिधान केलेली तेजःपुंज स्त्री दिसली.
कोण आहेस तू? मी वास्तू आहे. आम्हाला माफ कर. आम्ही सोडून चाललो. तिने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि स्मित करीत म्हणाली, मी इथल्या दगड-माती-सिमेंटमध्येच नसते काही. मी सर्वत्र असते. तुम्ही शोधलेल्या घरात देखील मी तुमच्याबरोबर असेन. झोप आता.त्याचे डोळे जडावत गेले. वास्तूदेवतेची आकृती धूसर होत गेली. झोप लागण्याआधीच्या शेवटच्या नॅनो सेकंदात त्याला भास झाला - वास्तूदेवतेचा चेहरा हुबेहूब त्याच्या आजीसारखा होता. किती दिवसांनी त्याला शांत झोप लागली.
Related
Articles
इराणवर अण्वस्त्र डागणार?
18 Aug 2026
नेवेकरवाडीच्या विहिरीत मळीमिश्रित पाणी
17 Aug 2026
राज्यसेवेतील अधिकारी-कर्मचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करा
12 Aug 2026
अदानी प्रकल्पाविरोधात आदिवासींचे आंदोलन
17 Aug 2026
‘शुद्धीकरणा’वरून खर्गे संतापले...
14 Aug 2026
नदीजोड प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार
14 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा