E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
एमपीएससीच्या ऑनलाइन परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध, या परीक्षा ऑफलाइनच घ्या !
Samruddhi Dhayagude
07 Jul 2026
रोहित पवार यांची मागणी
निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन करणार
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या प्रस्तावाला राज्यभरातील विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध असून, सरकारने हा निर्णय तातडीने रद्द करून परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइनच घ्याव्यात, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत केली. दरम्यान, ऑनलाईन परिक्षेचा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला.
एमपीएससी परिक्षा ऑफलाईन घेण्यासंदर्भात रोहित पवार यांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला होता. पवार म्हणाले की, राज्यात सुमारे ५० लाख विद्यार्थी एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करत आहेत. काही दिवसांपूर्वी एमपीएससीने जारी केलेल्या परिपत्रकात आगामी परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, यामुळे विद्याथ्र्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. देशातील विविध ऑनलाइन परीक्षांमध्ये पेपरफुटी, गैरप्रकार आणि तांत्रिक अडचणींची अनेक उदाहरणे आहेत. त्याउलट गेल्या २०-२५ वर्षांत एमपीएससीने घेतलेल्या ऑफलाइन परीक्षांमध्ये पेपरफुटीची एकही घटना घडलेली नाही. त्यामुळे ऑनलाइन परीक्षांऐवजी ऑफलाइन पद्धत कायम ठेवणे अधिक विश्वासार्ह ठरेल.
रोहित पवार यांनी नॉर्मलायझेशन, पेपरफुटीचा धोका तसेच विद्यार्थ्यांना दूरवर परीक्षा केंद्र मिळण्याच्या समस्याही उपस्थित केल्या. छत्रपती संभाजीनगर, वर्धा आणि अमरावतीसह राज्यातील विविध भागांत विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरोधात आंदोलने केली असून, आपणही त्यात सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने ऑनलाइन परीक्षेचा निर्णय मागे घेतला नाही, तर विद्यार्थी आणि लोकप्रतिनिधी एकत्र येऊन एमपीएससी आणि सरकारविरोधात मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Related
Articles
धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप
21 Jul 2026
पाणी उकळूनच प्या; महापालिकेचे आवाहन
15 Jul 2026
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रतिष्ठेचा 'लोकमान्य टिळक पुरस्कार'
21 Jul 2026
न्यायासाठी आईची पंतप्रधानांना आर्त साद
15 Jul 2026
कोयना धरणात ५७ टीएमसी पाणीसाठा
21 Jul 2026
’वंदे मातरम्’चा अपमान केल्यास फौजदारी गुन्हा
20 Jul 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
संयमी आणि निगर्वी व्यक्तिमत्व
2
गुन्ह्याची माहिती असूनही निष्क्रीय राहिलेल्या मुख्याध्यापिकेवर कारवाई
3
पाणी कपात रद्द : महापौर
4
मोशी दुर्घटना : पर्यावरण विभागाच्या मुख्य अभियंत्यासह कार्यकारी अभियंता निलंबित
5
होर्मुझमध्ये जहाजांच्या सुरक्षेसाठी शुल्क
6
अमेरिकेत जाण्याचे स्वप्न : भ्रम की सत्य?