E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वाघोलीत प्रचंड पावसांत बस अडकली
Samruddhi Dhayagude
07 Jul 2026
नगर रस्त्यावर १० फूट पाणी ; अग्निशमन दलाकडून प्रवासी सुरक्षित स्थळी
वाघोली : वाघोली परिसरात आज झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले. बऱ्याच रहिवासी इमारतींमध्ये घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असून बरीच वाहने पाण्यात वाहून गेली तर काही अडकून पडली आहेत.
बस मधील प्रवाशांची सुटका
पुणे-नगर महामार्गावरील वाघोली परिसरात घडली. येथे रस्त्यावर तब्बल १० फुटांपेक्षा जास्त पाणी साचल्यामुळे एक प्रवासी बस या पुरात अडकली. बसमध्ये पाणी शिरू लागल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी जीवाची बाजी लावत बोटीच्या साहाय्याने बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
जनजीवन विस्कळित, प्रशासनाचे आवाहन
पावसाचा जोर एवढा मोठा होता की सखल भागातील रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप आले होते. प्रशासनाने वाघोली परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले असून, नगर रस्त्यावरील वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Related
Articles
श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात आगमन
18 Jul 2026
अन्न सुरक्षा धोक्यात
19 Jul 2026
देवीची मूर्ती चोरुन तरुणीची तलावात उडी
20 Jul 2026
मानव आणि मनुष जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानावर
15 Jul 2026
’माउली... माउली’च्या जयघोषात पादुकांचे नीरा स्नान भक्तिभावात
16 Jul 2026
निर्देशांक घसरला
20 Jul 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
संयमी आणि निगर्वी व्यक्तिमत्व
2
गुन्ह्याची माहिती असूनही निष्क्रीय राहिलेल्या मुख्याध्यापिकेवर कारवाई
3
पाणी कपात रद्द : महापौर
4
मोशी दुर्घटना : पर्यावरण विभागाच्या मुख्य अभियंत्यासह कार्यकारी अभियंता निलंबित
5
होर्मुझमध्ये जहाजांच्या सुरक्षेसाठी शुल्क
6
अमेरिकेत जाण्याचे स्वप्न : भ्रम की सत्य?