सीरियातील भीषण स्फोटांतून फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोन बचावले   

दमास्कसमधील राजप्रासदाजवळ घटना; 18  जखमी 

दमास्कस :  फ्रान्सचे अध्यक्ष इम्यान्युल म्रक्रोन यांचा सीरिया दौरा सुरू असतान राजधानी दमास्कस येथील अध्यक्षांच्या राजप्रासादाजवळ मंगळवारी एका पाठोक्षाठ दोन भीषण स्फोट झाले. या स्फोटात अठराजण जखमी झाले असून मॅक्रोन थोडक्यात बचावल्याची चर्चा सुरू झाली  आहे.  
 
सिरियाचे अध्यक्ष अहमद अल शारा यांना भेटण्यासाठी मॅक्रोन राजप्रासादात आले होते. तेव्हा मार्गावरील दोन ठिकाणी भीषण स्फोट झाले. याबाबत प्रशासनाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान, मॅक्रोन सुरक्षित असल्याची माहिती  त्यांच्या कार्यालयाने दिली. स्फोटानंतरही दोन्ही अध्यक्षांची बैठक झाली. अहमद शारा सत्तेवर आल्यानंतर प्रथमच मॅक्रोन सीरिया दौर्‍यावर आले आहेत. या स्फोटांमुळे त्यांच्या दौर्‍याला गालबोट लागल्याची चर्चा सुरू आहे. युरोप आणि अमेरिकेने सीरियावरील निबैंध कमी करावेत, यासाठी मॅक्रोन यांनी मोठे प्रयत्न केले आहेत. त्याचे सोमवारी आर्थिक शिष्टमंडळासमवेत दमास्कसमध्ये आगमन झाले होते. 14 वर्षाच्या यादवीनंतर सिरियाचे फेरनिर्माण करण्यासाठी  सामंजस्य करारावर ते स्वाक्षरी देखील करणार आहेत. दरम्यान, स्थानिक दूरचित्रवाणीने वृत्तात्त म्हटले आहे की, एका पाठोपाठ दोन स्फोटांनी दमास्कस हादरले. एक स्फोटक कचरा कुंडीत तर दुसरे एका मोटारीत ठेवले होते. स्फोटात चार नागरिक आणि अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. दमास्कसचा परिसरातील पर्यटन मंत्रालय आणि राष्ट्रीय संग्रहालाच्या जवळ स्फोटानंतर काळा धूर पसरला होता. त्या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही गटाने अथवा संघटनेने घेतली नसून तपास केला जात असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सीरियाच्या दौर्‍यानंतर म्रक्रोन तुर्कीतील अंकारा येथे होणार्‍या नाटो  परिषदेसाठी जाणार आहेत. 

Related Articles