E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
शिंदेंचा धक्का, ठाकरेंची रामरक्षा !
Wrutuja pandharpure
07 Jul 2026
मुंबई वार्तापत्र , अभय देशपांडे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर महाराष्ट्राचे राजकारण थंडावेल असे वाटत होते. परंतु एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एका पाठोपाठ एक धक्के द्यायला सुरुवात केल्याने राजकारण पुन्हा तापले आहे. ठाकरे गटाच्या 9 पैकी सहा खासदारांना शिंदेंनी आपल्या पक्षात आणले. मुंबईचा शेवटचा गड पडल्याने अस्तित्वाची लढाई लढणार्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. पण त्यामुळे हात पाय गाळून न बसता उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघात सभा घेऊन शिंदे आणि त्यांना बळ देणार्या भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्याला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांच्या सारखा मोठा मोहरा आपल्या छावणीत आणला. यामुळे ठाकरे यांनी आपल्या आक्रमणाची धार आणखी वाढवली असून, त्यांना अयोध्येच्या रामंदिरातील लूटमारीच्या मोठा विषय मिळाला आहे.
2019 साली भाजपची साथ सोडून दोन काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करून उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकारणाची दिशा बदलली होती. भाजपने केलेल्या फोडफोडीमुळे सत्ता तर गेलीच, पण शिवसेना ही त्यांच्या हातातून गेली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वत्र पराभव झालाच, पण मुंबई महापालिकेचा शेवटचा गडही कोसळला. त्यामुळे अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी राम मंदिरातील चोरीचा विषय हातात घेत पुन्हा एकदा जय श्रीराम चा नारा दिला आहे. राम मंदिराचे आंदोलन करून केंद्रातील सत्तेपर्यंत पोचलेल्या भाजपशी संबंधित लोकच राममंदिराची दानपेटी लुटत आहेत. हिंदुत्वाचे कैवारी हिंदुत्वाचे मारेकरी झाले आहेत. हे लोक राम मंदिर पाडणार्या बाबरापेक्षा मोठे गुन्हेगार आहेत, अशी टीकेची झोड उठवत उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईत रामरक्षा आंदोलन केले. महाआरती केली. या आंदोलनात राफेल प्रकरणानंतर विस्मरणात गेलेल्या चौकीदार चोर है या घोषणा दिल्या गेल्या. चरक्षेीळींरीळरप म्हणजेच बहुसंख्याकांच्या राजकारणात त्याच मार्गाने जाऊन
शह - काटशह द्यावे लागतात. हिंदुत्ववादी भावनिक राजकारणावर घाव घालायचा असेल तर त्याच मार्गाने जाण्याचे ठाकरेंनी ठरवलेले दिसते आहे. राम मंदिरातील लूटमारीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दुखावलेल्या रामभक्तांना, हिंदुत्ववादी मतदारांच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यात त्यांना यश मिळेल की नाही याचे उत्तर लगेच मिळणार नाही. पण भाजपची मात्र अडचण नक्की झाली आहे.
रविवारच्या रामरक्षा आंदोलनात उद्धव ठाकरे यांनी प्रभू श्रीरामाच्या मंदिरात झालेल्या या चोरीचा निकाल निपक्षपातीपणे लागत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही,असा एल्गार केला. राममंदिरासाठी अनेकांचे रक्त सांडले, जीव गेले आहेत. मुंबईने बॉम्बस्फोट,दंगली झेलल्या. पण आता अयोध्येतून ज्या बातम्या येतात त्या ऐकून शिसारी येते. हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटते. तुमच्या धमन्यांत खर्या हिंदूंचे रक्त असेल तर आमच्यासोबत रामरक्षा करण्यासाठी रस्त्यावर या, असे आवाहन करत उद्धव ठाकरे यांनी भाजपमुक्त राम मोहिमेची घोषणा केली. भाजपविरुद्ध आक्रमकपणे मैदानात उतरलेल्या ठाकरेंना भाजप आणखी धक्के देते की जुळवून घेतात हे बघावे लागेल. उद्धव ठाकरे सुद्धा राजकारणाची बदललेली दिशा भाजपची कोंडी करण्यासाठी वापरतात की पुन्हा त्यांच्याशी जवळीक साधण्याची संधी साधण्यासाठी याचा वापर करतात ते ही बघावे लागेल. व्यक्तिगत आयुष्यात संकट किंवा अडचणी येतात तेव्हा जुनी मंडळी रामरक्षेचे पाठ करण्याचे सल्ले देत असत. हनुमान चालिसा सुद्धा संकटमोचनासाठी तोडगा म्हणून सुचवली जाते. उद्धव ठाकरे यांनी हे दोन्ही उपाय सुरू केले आहेत. पक्षाच्या अस्तित्वावर आलेले संकट यामुळे टळते का हे ही बघावे लागेल.
ठाकरेंना धक्का !
सहा खासदार फुटल्याचा धक्क्यातून उद्धव ठाकरे यांची शिवसेना सावरत नाही तोवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या आठवड्यात त्यांना आणखी एक मोठा धक्का दिला. माजी मंत्री व आदित्य ठाकरे यांचे निकटचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे सचिन अहिर अचानक ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या छावणीत दाखल झाले व त्यांना थेट उपसभापतीपदी बसवण्यात आले. खासदार फुटीचा विषय अनेक महिने सुरू होता. परंतु हे ऑपरेशन एकनाथ शिंदे यांनी अत्यंत गुप्त ठेवण्यात आले होते.या ऑपरेशनची महायुतीतल्या सोडाच, पण त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनाही कल्पना नव्हती. उपसभापती पदासाठी अर्ज भरण्यापूर्वी शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याची कल्पना दिली. इतरांना उपसभापती पदासाठी अर्ज भरण्यासाठी गेले तेव्हाच ठाकरे गटाचे सचिन आहेर हे महायुतीचे उमेदवार आहेत हे कळले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीन वेळा विधानसभेवर निवडून आलेले, मुंबईचे अध्यक्ष व राज्यमंत्री राहिलेले सचिन अहिर मागच्या विधानसभेपूर्वी शिवसेनेत आले होते. आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळी विधानसभा मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी त्यांना व सुनील शिंदे या दोघांना विधानपरिषदेचे आमदार करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांच्या शिंदेंसोबत जाण्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या रस्त्यात अडथळे निर्माण होणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यभरात पानीपत झाले तरी मुंबईत बर्यापैकी यश मिळाले होते. ठाकरेंच्या 20 आमदारांपैकी 10 आमदार मुंबईतून निवडून आलेले आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतही ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईत चांगली झुंज दिली. त्यामुळे मुंबईतली त्यांची मुळं कापण्याची सुरुवात झाली आहे. सचिन अहिर मुंबईची खडानखडा माहिती असलेले नेते आहेत. कुख्यात गँगस्टर अरुण गवळी याचे भाचे असल्याने त्यांच्याकडे राजकारणात लागणारी दंडशक्तीसुद्धा आहे. त्यामुळे त्यांच्यासारखा मोहरा जाणे ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. हे ऑपरेशन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा ब्रेकिंग न्यूज तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील असे सांगून आणखी धक्क्यांचे संकेत दिले आहे. खासदारांनंतर आमदारांचेही ऑपरेशन टायगर होणार अशी कुजबुज सुरूच आहे.
सचिन अहिर यांना सोबत घेताना शिंदेंनी हुशारीने पुन्हा एकदा पक्षांतर बंदी कायद्याला बगल दिली. विधानपरिषदेत ठाकरे गटाचे सहा आमदार आहेत. त्यामुळे दोन तृतीयांश फुटीसाठी किमान चार आमदार लागतील, मग एकटे आहेर कसे बाहेर पडले असा प्रश्न सर्वांना पडला होता. शिंदे यांनी काही वेळाने खुलासा केला तेव्हा सगळा उलगडा झाला. आहेर यांची विधिमंडळ सचिवालयात शिवसेना पक्षाचे विधानपरिषद सदस्य अशी नोंद आहे. 4 जुलै 2022 ला सचिन आहेर व सुनील शिंदे विधानपरिषदेचे सदस्य झाले तेव्हा शिवसेनेच्या फुटीवर शिक्कामोर्तब झालेले नव्हते. शिंदे आणि ठाकरे यांच्या संघर्षात निवडूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने निर्णय देऊन पक्षाचे नाव व चिन्हं त्यांच्या गटाला दिले होते. फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव व मशाल चिन्हं दिले. पण सोबत असलेल्या दोन आमदारांची नोंद विधिमंडळात शिवसेना अशी राहिली. त्याचाच आधार घेत सचिन अहिर शिवसेना सदस्य आहेत, शिवसेना एकच व आमची आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय पक्षांतर नाहीच, असा शिंदे गटाचा दावा आहे. तांत्रिक नोंदीचा फायदा घेत शिंदेंनी पुन्हा एकदा पक्षांतर बंदी कायद्याला बगल दिली होती. त्यामुळे भविष्यात यावर कायदेशीर लढाई होईल, पण आज तरी शिंदेंनी ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे.
ठाकरे म्हणतात हे ऑपरेशन फडणवीस आहे !
ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार सोबत आल्याने शिंदेंचे केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील वजन वाढले आहे. महिला आरक्षण व मतदाररसंघ पुनर्रचनेचे विधेयक लोकसभेत दोन तृतीयांश संख्याबळ नसल्याने मंजूर करता आले नाही. मोदी सरकार यासाठी प्रचंड आग्रही आहे. तृणमूल काँग्रेस व शिवसेना ठाकरे फोडून त्यांनी आपले बळ 26 ने वाढवले आहे. आणखी काही खासदारांची तजवीज करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नात शिंदेंनी केंद्रातील भाजप नेत्यांकडे आपले वजन वाढवले आहे. त्यामुळे 2024 ला पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे भंगलेले स्वप्न पुन्हा साकार होऊ शकते अशा अटकळी बांधल्या जात आहेत. फडणवीस यांच्याकडे केंद्रातील मोठी जबाबदारी सोपवण्याचा विचार सुरू असल्याची कुजबुज ही सुरू असते. त्यामुळे शिंदे यांनी आमचे नाही तर फडणविसांचे ऑपरेशन सुरू केले आहे,असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. अलीकडच्या काळात ठाकरेंना मुख्यमंत्र्यांची नेहमीच चिंता वाटत असते. मराठी माणूस म्हणून त्यांनी पंतप्रधान पदासाठी फडणवीसांना शुभेच्छाही दिल्या आहेत. हा जिव्हाळा आपल्या मदतीला येईल अशी आशा त्यांना वाटत असावी.
Related
Articles
जिल्हा परिषदेच्या मालमत्तेवर आता डिजिटल नजर
21 Jul 2026
हंसिकाने बुडापेस्टमध्ये भारतीय ध्वज फडकवला
18 Jul 2026
कोयना धरणात ५७ टीएमसी पाणीसाठा
21 Jul 2026
‘...तोपर्यंत माझ्याबाबतच्या चर्चा सुरूच राहतील’
21 Jul 2026
त्रिपुराच्या पोलिस प्रमुखाचा मृतदेह कार्यालयात सापडला
20 Jul 2026
डॉ. दीपक टिळक यांना जवळून पाहताना...
19 Jul 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
संयमी आणि निगर्वी व्यक्तिमत्व
2
गुन्ह्याची माहिती असूनही निष्क्रीय राहिलेल्या मुख्याध्यापिकेवर कारवाई
3
पाणी कपात रद्द : महापौर
4
मोशी दुर्घटना : पर्यावरण विभागाच्या मुख्य अभियंत्यासह कार्यकारी अभियंता निलंबित
5
होर्मुझमध्ये जहाजांच्या सुरक्षेसाठी शुल्क
6
अमेरिकेत जाण्याचे स्वप्न : भ्रम की सत्य?