E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
एकमेव महासत्ता नाही (अग्रलेख)
Samruddhi Dhayagude
06 Jul 2026
ताज्या युद्धात अमेरिका पराभूत झाली तरीही आपण इराणला धडा शिकवला असा भ्रम ट्रम्प बाळगत आहेत. लोकशाहीत व्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचे असले तरी एक व्यक्ती लोकशाही पेक्षा मोठी नसते हे ट्रम्प विसरले आहेत.
अमेरिकेचा 250 वा स्थापना दिन नुकताच साजरा झाला. संस्था असो किंवा देश; स्थापना दिन किंवा वर्धापन दिन सिंहावलोकनाची संधी देतो. आपण काय कमावले आहे, काय गमावले आहे आणि पुढील वाटचाल कशी असावी याचा विचार करण्याची ही वेळ असते. अमेरिकेचे विद्यमान ’मुख्य अधिकारी’ तो करणार का हा प्रश्न आहे. तत्कालीन समाज धुरिणांनी, नेत्यांनी वसाहतवाद आणि साम्राज्यवाद नाकारून ‘स्वातंत्र्याचा जाहीरनामा’ प्रसिद्ध केला. ’जीवन, स्वातंत्र्य आणि आनंदाचा शोध’ यांचा त्यात उल्लेख आहे. पुढील अनेक दशके अमेरिकेने त्याच तत्त्वांवर वाटचाल केली. व्यक्ती मोठी होते तेव्हा देशही मोठा होतो, हे अलिखित सूत्र अमेरिकेने पाळले व सांभाळले. त्या देशाने प्रगती केली ती याच सूत्रावर. सामान्य व्यक्तीही आर्थिक दृष्ट्या संपन्न होऊ शकते, राजकारणात-समाजकारणात उच्च पद प्राप्त करू शकते यालाच ’अमेरिकन ड्रीम’ असे म्हटले जाऊ लागले. दुसर्या महायुद्धानंतर अमेरिकेची सर्व क्षेत्रात वेगाने प्रगती झाली. गेल्या शतकाच्या आरंभापर्यंत अमेरिकेचा उल्लेख ’नवे जग’ असा होत असे. तेथे वसाहती स्थापन करणार्या सत्तांनी तो शब्दप्रयोग वापरात आणला. तो बराच काळ प्रचलित होता कारण अमेरिकेत खरोखरी कोणासही प्रगतीची संधी मिळत होती. आता तसे घडत आहे का?
लोकशाहीला धोका
एके काळी जगातील कोणत्याही भागातील व्यक्तीस अमेरिकेत सहज प्रवेश मिळत होता. अशा व्यक्तींमुळे अमेरिकेने विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य आदी अनेक क्षेत्रांत चकित करणारी प्रगती केली. मुक्त लोकशाहीचा उद्घोष करणार्या या देशात ’60 च्या दशकापर्यंत वर्ण विद्वेष ’अधिकृत’ होता. स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता ही काळी बाजू विसरता येणार नाही. त्यातून बाहेर पडत अमेरिका समानतेचे उदाहरण बनला. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि उच्चार स्वातंत्र्याचे प्रतीक बनला. दुसर्या महायुद्धानंतर ’शीत युद्धाचा’ काळ आला. तेव्हा दोन महासत्ता मानल्या जात असत. सोव्हिएत रशियाचे विघटन आणि जगात साम्यवादी सत्तेचा झालेला पाडाव यानंतर अमेरिका एकमेव महासत्ता असल्याचे बोलले जाऊ लागले आणि अमेरिकेचाही तसाच समज झाला. तंत्रज्ञान किंवा व्यवसाय, प्रत्येक क्षेत्रात ’नावीन्य’ आणल्याने अमेरिकेची आर्थिक प्रगती होत राहिली, त्याला लष्करी ताकदीची जोड मिळाली आणि अमेरिका एकमेव महासत्ता असल्याच्या समजास बळ मिळाले. पण काळ बदलत होता. पूर्वी मागास समजल्या जाणार्या आफ्रिका आणि आशिया खंडातील देश झपाट्याने प्रगती साधत होते. 4 चीन अल्पावधीत आर्थिक महासत्ता बनला. आज अमेरिकेचे अनेक उद्योग चीनमध्ये तयार होणार्या सुट्या भागांवर चालत आहेत हे वास्तव आहे. ’हॉलिवूड’ चे चित्रपट ही अमेरिकेची ’सौम्य ताकद’ गणली जात होती. तिला भारत आणि कोरियाने शह दिला. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात भारतानेही आर्थिक, सामाजिक तसेच लष्करी क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली. ऑस्ट्रेलियाला महत्त्वाचा भागीदार मानणे अमेरिकेला भाग पडत आहे. हे वास्तव स्वीकारणे सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जड जात असावे. व्यापाराचा ते शस्त्रासारखा वापर करू पाहात आहेत. सर्व देशांना आपले मांडलिक बनवू पाहात आहेत. अमेरिकन विद्यापीठे जगात आदरणीय मानली जातात. त्यांना आपल्या इच्छेनुसार वाकवण्यासाठी ट्रम्प या विद्यापीठांचा निधी रोखत आहेत. त्यांचे मनमानी निर्णय रोखणार्या न्यायालयांनाही जुमानण्यास ते तयार नाहीत. कोणासही ’बेकायदा’ स्थलांतरित ठरवून त्यांची हकालपट्टी ते करत आहेत. हा अमेरिका जगास माहीत नाही. धर्म, वर्ण यांवर आधारित विद्वेष पसरवण्याचे ट्रम्प यांचे धोरण हिटलरशी साम्य सांगणारे आहे. पूर्वीच्या रोमन सम्राटासारखे ते वागत आहेत. या सम्राटांचे चित्र त्या काळातील नाण्यांवर कोरलेले असे. अमेरिकेच्या चलनी नोटेवर स्वत:चे छायाचित्र छापण्याचा ट्रम्प यांचा अट्टाहास आहे. मात्र आजच्या काळात अमेरिका आणि आपण एकमेव महासत्ता नाही हे सत्य त्यांना स्वीकारावे लागेल.
Related
Articles
सोनम वांगचुक यांनी तातडीने उपोषण सोडावे
16 Jul 2026
महाबळेश्वरच्या जंगलात दुर्मीळ ऑर्किड
20 Jul 2026
अन्नधान्याच्या महागाईबाबत वाढली चिंता
21 Jul 2026
इराणकडून कुवेतवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले
20 Jul 2026
प्राप्त परिस्थितीला लेखकाने सृजनात्मक उत्तर द्यावे : सासणे
21 Jul 2026
नीट, देणगी, आंदोलनामुळे लोकसभेच्या कामकाजावर पाणी
20 Jul 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
संयमी आणि निगर्वी व्यक्तिमत्व
2
गुन्ह्याची माहिती असूनही निष्क्रीय राहिलेल्या मुख्याध्यापिकेवर कारवाई
3
पाणी कपात रद्द : महापौर
4
मोशी दुर्घटना : पर्यावरण विभागाच्या मुख्य अभियंत्यासह कार्यकारी अभियंता निलंबित
5
होर्मुझमध्ये जहाजांच्या सुरक्षेसाठी शुल्क
6
अमेरिकेत जाण्याचे स्वप्न : भ्रम की सत्य?