E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
ठाकरे गटाच्या सहा खासदारांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश
Samruddhi Dhayagude
23 Jun 2026
मुंबई, (प्रतिनिधी) : शिवसेनेच्या ठाकरे गटातून बाहेर पडून स्वतंत्र गट स्थापन केलेल्या सहा बंडखोर खासदारांनी सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. जमिनीशी नाळ असलेले हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणार्या खर्या शिवसेनेत आले असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या खासदारांनी व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही तर मतदारसंघाच्या विकासासाठी निर्णय घेतला असून त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. त्यांची सगळी जबाबदारी आपण घेत असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाघचौरे, नागेश आष्टीकर, संजय दिना पाटील यांनी काल शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. मागच्या आठवड्यात या खासदारांच्या बंडाची सुरूवात झाली होती. एकेक करत दिल्लीत पोचलेल्या या खासदारांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेऊन गट स्थापनेचे पत्र दिले होते. परंतु, ओमराजे निंबाळकर यांनी थोडा अवधी मागितल्यामुळे पुढची प्रक्रिया थांबली होती. ओमराजे यांनी रविवारी आपला निर्णय जाहीर केल्यानंतर काल या सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रवेशाआधी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी ठाकरे गटाचे सहा खासदार आणि शिंदे यांच्यात तब्बल दोन तास बैठक झाली.
या बैठकीनंतर शिंदे हे सहा खासदारांसोबत मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आले. तेथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे सहा खासदार खर्या शिवसेनेत सहभागी होत असल्याचे जाहीर केले. ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाले असून हे सहा टायगर माझ्यासोबत आले आहेत. मी चार वर्षांनंतर चौकार नाही तर षटकार मारला आहे. २०२२ मध्ये केलेल्या उठावाचा हा दुसरा टप्पा असल्याचे यावेळी शिंदे म्हणाले.
४ वर्षांपूर्वी आम्ही उठाव केला. तेव्हा ४० आमदार सोबत होते. परंतु, २०२४ ला ६० आमदार निवडून आणले. जनतेने आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेला मोठे यश मिळाले. त्यामुळे शिवसेना राज्यातील क्रमांक दोनचा पक्ष झाला असल्याचे शिंदे म्हणाले.
२०२२ ला शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी, धनुष्यबाण, बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी उठाव केला होता. आता हा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आपला लढा हिंदुत्वाच्या विचारांचा आहे. जिथे शिवसेनेचे विचार, तिथे शिवसैनिक. त्यामुळे बाळासाहेबांच्या खर्या शिवसेनेते सहभागी होण्याचा निर्णय यांनी घेतला. हे कोणीही व्यक्तिगत फायद्यासाठी आलेले नाहीत, असे शिंदे म्हणाले.
Related
Articles
प्रभु रामाचा अवमान झाल्याचा कांगावा...
20 Jul 2026
शाश्वत व्यवसाय उभारणीवर भर
20 Jul 2026
हायड्रोजनवर धावली पहिली रेल्वे
18 Jul 2026
निर्देशांक घसरला
20 Jul 2026
आजपासून पांडुरंगाचे २४ तास दर्शन
16 Jul 2026
रणयज्ञात पडू लागल्या आहुत्या...
20 Jul 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
संयमी आणि निगर्वी व्यक्तिमत्व
2
गुन्ह्याची माहिती असूनही निष्क्रीय राहिलेल्या मुख्याध्यापिकेवर कारवाई
3
पाणी कपात रद्द : महापौर
4
मोशी दुर्घटना : पर्यावरण विभागाच्या मुख्य अभियंत्यासह कार्यकारी अभियंता निलंबित
5
होर्मुझमध्ये जहाजांच्या सुरक्षेसाठी शुल्क
6
अमेरिकेत जाण्याचे स्वप्न : भ्रम की सत्य?