E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
निर्देशांक वधारला
Samruddhi Dhayagude
03 Jun 2026
मुंबई : सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी आयटी क्षेत्रातील समभागांच्या जोरदार तेजीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३८२ अंकांनी आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचा निफ्टी १००.९५ अंकांनी वधारला.
काल निर्देशांक ३८२.५० अंशांनी वधारून ७४,६४९.८४ अंशांवर स्थिरावला. बीएसईच्या ३० पैकी २० कंपन्यांचे समभाग तेजीसह बंद झाले. तर, १० कंपन्यांना घसरणीचा सामना करावा लागला. सत्राअंतर्गत व्यवहारात निर्देशांक ७३,८१५.१२ अंकांच्या नीचांकी पातळीवर तर, १,०४७.०७ अंकांनी उसळी घेत ७४,८६२.१९ अंकांपर्यंत पोहोचला होता. ५० समभागांचा समावेश असलेला ’एनएसई निफ्टी’ १००.९५ अंकांनी वधारून २३,४८३.५५ अंकांवर बंद झाला.
काल टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे समभाग सर्वाधिक ६.५३ टक्क्यांनी वाढले. इन्फोसिसचे समभाग ५.६६ टक्के, एचसीएल टेकचे समभाग ४.०८ टक्के आणि टेक महिंद्राचे समभाग १.७६ टक्क्यांनी वधारले. अदानी पोर्टस्, टायटन, एटरनल, एचडीएफसी बँक आणि महिंद्रा अँड महिंद्राचे समभाग देखील तेजीत होते. दुसरीकडे, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, पॉवर ग्रिड आणि आयसीआयसीआय बँक या कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी ३,९११.६८ कोटींच्या समभागांची विक्री केली. तर, निर्देशांक सोमवारी ५०८.४० अंकांनी घसरून ७४,२६७.३४ वर स्थिरावला होता.
रुपया १० पैशांनी घसरला
मुंबई : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया मंगळवारी १० पैशांनी घसरून ९५.२९ (तात्पुरत्या स्वरूपात) वर बंद झाला. त्यामुळे आता डॉलरसाठी ९५.२९ रुपये मोजावे लागणार आहे.
काल आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया डॉलरच्या तुलनेत ९५.१६ वर उघडला. सत्राअंतर्गत व्यवहारात रुपयाने ९५.०३ ही उच्चांकी आणि ९५.३१ ही नीचांकी पातळी गाठली. अखेरच्या सत्रात रुपया ९५.२९ वर बंद झाला. सोमवारी रुपया ३४ पैशांनी घसरून डॉलरच्या तुलनेत ९५.१९ वर बंद झाला होता. भारतीय रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून (बुधवार) तीन दिवस चालणार आहे. रिझर्व बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय अपेक्षित असल्याचे जाणकारांनी सांगितले.आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर १.६६ टक्क्यांनी घसरून ९३.४० डालर्स प्रतिपिंपावर आले आहेत.
Related
Articles
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना श्रद्धांजली
14 Jun 2026
अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर पोलिसांचा पहाटे छापा
14 Jun 2026
सिंहाचा छावा जन्म घेणार
09 Jun 2026
आप्तांच्या आठवणीने कुटुंबीय गहिवरले
13 Jun 2026
व्यापारी जहाजांवरील हल्ले अमान्य
14 Jun 2026
डॉ. राहुल पालके २१ वेळा नेट-सेट-गेट उत्तीर्ण
08 Jun 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
संकटाची चाहूल (अग्रलेख)
2
फिलिपाईन्समध्ये शक्तिशाली भूकंप
3
सुग्रीवाचे गैरवर्तन आणि रामाचे मार्गदर्शन
4
खत अनुदान तीन लाख कोटींपेक्षा अधिक?
5
भूगावमध्ये विजेचा लपंडाव; नागरिकांमध्ये संताप
6
तीन वर्षीय विधी सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर