आता उत्पादक किंमत निर्देशांक   

नवी दिल्ली : भारताची चलनवाढ मोजण्याची चौकट अद्ययावत करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार आता घाऊक किंमत निर्देशांकाऐवजी (डब्ल्यूपीआय) उत्पादन किंमत निर्देशांक (पीपीआय) सुरू करणार आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण महतो यांनी मंगळवारी याबाबतची माहिती दिली.
 
महागाईचे वास्तववादी मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे महतो यांनी सांगितले. सरकार पुढील पाच वर्षांत घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्याने बंद करणार असून, त्याऐवजी उत्पादक किंमत निर्देशांक लागू करणार आहे. येत्या १५ जूनपासून नवी मालिका सुरू केली जाणार असल्याचे ते म्हणाले. 

Related Articles