E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पीटर मँडलसन फाईल सार्वजनिक
Samruddhi Dhayagude
03 Jun 2026
पंतप्रधान स्टार्मर यांची डोकेदुखी वाढण्याबरोबरच पदही धोक्यात?
लंडन : अमेरिकेत राजदूतपदी नियुक्ती झाली तर ब्रिटन सरकारला कोणताही पश्चात्ताप वाटणार नाही, असे माजी राजदूत पीटर मँडलसन यांची विधाने असलेली फाईल सार्वजनिक झाली आहे. पीटर हे ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांचे निकटवर्ती आहेत. त्यामुळे स्टार्मर यांची डोकेदुखी वाढली असून त्यांचे पदही अधिकच धोक्यात आले आहे.
अमेरिकेतील जेफ्री एपस्टीन अत्याचार प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तीची प्रकरणे आता ब्रिटनमध्ये पुन्हा गाजू लागली आहेत. त्यात पीटर यांचा समावेश आहे. पंतप्रधान स्टार्मर यांचे पीटर मँडलसन निकटवर्तीय आहेत. त्यांनी एपस्टीन याच्यासोबत संबंध असताना देखील अमेरिकेत स्वत:ची राजदूतपदी नियुक्ती करून घेतली होती. तसेेच सरकारला अशी नियुक्ती करताना कोणताही पश्चात्ताप होणार नाही, असे वचन दिले होते. आता मँडलसन यांच्या नियुक्तीबाबतचा १ हजार ५०० पानी अहवाल प्रकाशित झाला आहे. तो जाहीर करावा, अशी मागणी खासदारांनी केली होती. या कागदपत्रांमध्ये मँडेलसन यांनी तत्कालीन परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांना त्यांच्या नियुक्तीपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी आहे; ज्यामध्ये त्यांनी सरकारला हे पद दिल्याबद्दल कधीही पश्चात्ताप होणार नाही, असे वचन दिले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात ते अमेरिकेत ब्रिटनचे राजदूत म्हणून काम पाहात होते. आता हे प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून पंतप्रधान स्टार्मर यांनी मँडलसन यांची हकालपट्टी केली होती.
एपस्टीन प्रकरणात सहभाग असतानाही मँडलसन यांची नियुक्ती अमेरिकेत राजदूत म्हणून कशी काय करण्यात आली, असे प्रश्न स्टार्मर यांना विचारून विरोधक आणि त्यांच्या खासदारांनी भंडावून सोडले होते. एकंदरीत स्टार्मर यांच्या पंतप्रधानपदाची खुर्ची आता धोक्यात आली आहे.
पीटर मँडलसन यांचे उद्योग
पीटर मँडलसन हे एक वरिष्ठ ब्रिटिश राजकारणी आहेत. त्यांचे मृत आणि लैंगिक गुन्हेगार प्रकरणातील दोषी जेफ्री एपस्टीन यांच्यासोबत संबंध होते. त्यामुळे आता ब्रिटनसरकार एका राजकीय संकटात सापडले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांमधून उघड झाले की, मँडलसन आणि त्यांच्या जोडीदाराला एपस्टीन याच्याकडून हजारो पाउंड मिळाले होते. या फाइल्समधून असेही स्पष्ट होते की, २००८ मध्ये जागतिक आर्थिक मंदी आली होती. त्या आर्थिक संकटादरम्यान मँडलसन यांनी ब्रिटनची सरकारची गोपनीय माहिती एपस्टीनला पाठवली होती. एपस्टीन याच्यासोबत मँडलसन यांचे संबंध आहेत, असा इशारा देऊनही आणि प्राथमिक सुरक्षा तपासणीत अयशस्वी ठरल्यानंतरही, पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी डिसेंबर २०२४ मध्ये मँडलसन यांची अमेरिकेत ब्रिटनचे राजदूत म्हणून नियुक्ती केली. पोलिसांच्या तपासात एपस्टीनला संवेदनशील माहिती दिल्याप्रकरणी सार्वजनिक पदाचा गैरवापर केल्याच्या संशयावरून फेब्रुवारी २०२६ मध्ये मेट्रोपॉलिटिन पोलिसांनी मँडलसनला अटक केली होती त्यानंतर जामिनावर सोडण्यात आले. सप्टेंबर २०२५ मध्ये स्टार्मर यांना मँडलसन यांना राजदूतपदावरून काढून टाकण्यास भाग पडले गेले. जून २०२६ मध्ये, ब्रिटन सरकारला १ हजार ५०० हून अधिक पानांच्या अतिरिक्त फायली आणि खासगी संदेश प्रसिद्ध करण्यास भाग पडले होते. त्यात उघड झाले की, सरकारी मंत्री खासगीत स्टार्मर यांच्या नेतृत्वावर निराश होते आणि मँडलसन यांनी आपला वैयक्तिक फोन तपासणी अधिकार्यांकडे देण्यास नकार दिला होता.
Related
Articles
समग्र विकास घडवणारे शिक्षण आहे कुठे?
10 Jun 2026
तेजीचे एक आवर्तन संपले
08 Jun 2026
लेफ्टनंट जनरल धीरज सेठ होणार भारताचे नवे लष्करप्रमुख
13 Jun 2026
जोरदार पावसासाठी प्रतीक्षा
10 Jun 2026
नवले पुलाजवळ सिमेंट मिक्सर उलटला
11 Jun 2026
अमेरिकाचा 4-1 ने पेराग्वेवर दणदणीत विजय
14 Jun 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
संकटाची चाहूल (अग्रलेख)
2
फिलिपाईन्समध्ये शक्तिशाली भूकंप
3
सुग्रीवाचे गैरवर्तन आणि रामाचे मार्गदर्शन
4
खत अनुदान तीन लाख कोटींपेक्षा अधिक?
5
भूगावमध्ये विजेचा लपंडाव; नागरिकांमध्ये संताप
6
तीन वर्षीय विधी सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर