इराणसोबत शांतता चर्चा वेगाने   

ट्रम्प यांचा दावा; लेबाननवरील इस्रायलचे हल्ले थांबणार 

वॉशिंग्टन : इराणसोबत शांतता चर्चा वेगाने सुरू असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दुसरीकडे इराणने नवे हल्ले केल्यामुळे युद्धविराम धोक्यात आला आहे. दरम्यान, लेबाननवरील हल्ले तातडीने थांबवा, असे आवाहन करणारा फोन ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना केले आहे. तसेच हल्ले थांबविले जातील, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. 
 
ट्रुथ सोशलवर ट्रम्प यांनी पोस्ट टाकून इराणसोबत शांतता चर्चा वेगाने सुरू असल्याचे म्हटले आहे. औपचारिक युद्धविराम करण्याचे प्रयत्न दोन्ही देशांचे सुरू आहेत. पडद्यामागे आणि पडद्या पुढे अशा प्रकारे दुहेरी चर्चा सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले चढवत असल्याने ते कराराच्या जवळ पोहोचले की नाही, याचा थांगपत्ता लागत नाही. हल्ल्यामुळे चर्चा सुरू राहण्याऐवजी ती फिस्कटत चालली आहे. 
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि हिज्बउल्ला गटाच्या प्रतिनिधींसोबत स्वतंत्र फोनवरून चर्चा केली आहे. त्या अंतर्गत इस्रायलचे सैन्य आता लेबाननची राजधानी बैरुतकडे जाणार नाही. तेथे कोणतेही सैन्य जाणार नाही किंवा मार्गावर देखील नाही. पुढे गेलेले सैन्य आता परतीच्या मार्गावर आहे. गोळीबार करणार नाही, असे आश्वासन हिज्बउल्लाच्या प्रतिनिधींनी दिले आहे. हिज्बउल्ला आणि इस्रायल आता एकमेकांवर हल्ले करणार नाहीत. इस्रायलने लेबाननवर हल्ले थांबविले नाहीत तर चर्चा पुढे सुरू राहणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प म्हणाले, अगोदर चर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेतला असला तरी ती पुढे सुरू राहण्यास चालना मिळणार आहे. लढा देण्याऐवजी चर्चा कधीही चांगली असेल. चर्चेबाबत काही जर त्यांनी सांगितले नाही तर आम्ही तेथे बॉम्ब फेक करणार नाही.
 

Related Articles