शांतीसेनेतील जवानांचा गौरव   

५३ महिलांचा समावेश; संयुक्त राष्ट्राकडून पदके प्रदान

संयुक्त राष्ट्र : संयुक्त राष्ट्राच्या (युनो) दक्षिण सुदान येथे शांतीसेनेत कार्यरत असताना मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल ५५० भारतीय जवानांचा गौरव करण्यात आला आहे. त्यात ५३ महिलांचा समावेश आहे. 
 
सुदानमध्ये यादवी युद्ध सुरू आहे. तेथील नागरिकांचे संरक्षण आणि मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या वतीने विविध देशांचे शांती सैनिक पाठवले जातात. त्यात भारतीय जवानांचाही समावेश आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना गौरव पदक देऊन गौरविण्यात आले आहे. निळी टोपी घातलेले भारतीय जवान आणि ४६४ रवांडाच्या सैनिकांचाही गौरव करण्यात आला. संघर्ष सुरू असलेल्या भागात गस्त घालणे, शांतता निर्माण करून नागरिकांना संरक्षण देणे, अशी कामे त्यांनी केली होती. त्याशिवाय विविध शिबिरे आयोजित करून नागरिकांना अनमोल सहकार्य केले होते. त्यामध्ये समुदायात सामंजस्य निर्माण करणे, पशुवैद्यकीय शिबिरे भरवून उपचार करणे, महिलांना स्वरसंक्षणाचे धडे देणे,  लिंगभेद हिंसाचार रोखणे याचा समावेश होता. 

धैर्याचा गौरव

दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेचे दलप्रमुख, मेजर-जनरल जुनहुई वू यांनी सांगितले की, प्रदान करण्यात आलेले प्रत्येक पदक हे आमच्या शूर शांती सैनिकांचे धैर्य आणि चिकाटी यांचा गौरव करते; हे सैनिक एका आव्हानात्मक वातावरणातही शिस्त, कार्यक्षमता आणि सांघिक कार्याचे सर्वोच्च मापदंड प्रस्थापित करतात.

Related Articles