वेदांता समूहावर ईडीचे छापे   

‘फेमा’अंतर्गत कारवाई

नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योजक अनिल अग्रवाल यांच्या ’वेदांता समूहा’विरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) परकीय चलन उल्लंघन (फेमा) प्रकरणात कारवाई केली. ईडीने वेदांता समूहाच्या कार्यालयांची काल झाडाझडती घेतली, असे अधिकार्‍यांनी सांगितले. ‘वेदांता’चे खाणकाम क्षेत्रात मोठे नाव आहे. दिल्ली, मुंबई आणि राजस्तानच्या उदयपूरमध्ये वेदांताच्या चार ठिकाणांवर ईडीच्या अधिकार्‍यांनी सोमवारी एकाच वेळी कारवाई केली, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
 
जेव्हा एखादी व्यक्ती अथवा कंपनी परेदी चलन व्यवस्थापनाच्या (फेमा) व्यवहारासंबंधीच्या नियमांचे उल्लंघनकरते, तेव्हा फेमाअंतर्गत कारवाई करण्यात येते. वेदांताच्या प्रवक्त्याने ईडीच्या कारवाईस दुजोरा दिला आहे. वेदांताकडून संबंधित अधिकार्‍यांना पूर्ण सहकार्य केले जात असून, त्यांनी मागितलेली सर्व माहिती पुरवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
कंपनी सर्व लागू कायदे आणि नियमांचे पालन करण्यास कटिबद्ध आहे. सध्या यावरर अधिक भाष्य करु शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.’वेदांता लिमिटेड’ ही धातू, महत्त्वपूर्ण खनिजे आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक स्तरावरील अग्रगण्य उत्पादक कंपनी आहे. या कंपनीचे कामकाज भारत, आफ्रिका, मध्य-पूर्व आणि पूर्व आशियात विस्तारलेले आहे.

Related Articles