E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
नेतान्याहूंमुळे पाकिस्तानचे शरीफ पडले तोंडावर
Samruddhi Dhayagude
08 Apr 2026
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी इस्त्रायल अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरूद्ध दोन आठवड्यांचा युद्धविराम करण्याचा निर्णयाचे समर्थन करतो असे वक्तव्य केले. मात्र हे वक्तव्य करताना त्यांनी मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची चांगलीच गोची केली. त्यांनी या युद्धबंदीमध्ये लेबनॉनचा समावेश नाहीये असे सांगितले.
अमेरिकेच्या प्रयत्नांना पाठिंबा
आज नेतान्याहूंच्या कार्यालयाने अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केले. त्यात, 'अमेरिकेच्या इराणकडे अण्वस्त्र, मिसाईल नसावेत तसेच अमेरिका, इस्त्रायल, इराणचे अरब शेजारी तसेच जगाला दहशतवादाचा धोका असू नये यासाठी अमेरिकेने केलेल्या प्रयत्नांना इस्त्रायलचा देखील पाठिंबा आहे.' असा उल्लेख केला आहे.
युद्धबंदीबाबत संभ्रम
त्याचबरोबर या अधिकृत वक्तव्यात, 'अमेरिकेने इस्त्रायलला सांगितले आहे की, ते अमेरिका, इस्त्रायल आणि इस्त्रायलचे या भागातील सहकारी या सर्वांचे एकत्रित उद्दीष्ट आगामी वाटाघाटीत साध्य करण्यासाठी कटीबद्ध आहेत.' याचबरोबर या वक्तव्यात दोन आठवड्यांच्या या युद्धबंदीमध्ये लेबनॉनचा समावेश नाहीये असे देखील सांगितले.
शरीफ तोंडावर आपटले
पाकिस्तानची पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हा युद्धबंदी सगळीकडे लागू करण्याबाबत अमेरिका, इराण आणि त्यांचे सहकारी देश सहमत झाले आहेत असे सांगितले होते. त्यानंतर युद्धबंदीमध्ये लेबनॉनचा समावेश नाहीये असे वक्तव्य नेतान्याहू यांनी केले आहे. त्यामुळे मोठं मोठं बोलणारे शरीफ तोंडावर आपटले आहेत.
लेबनॉनमध्ये नरसंहार
लेबनॉनला मध्य पूर्व आशियातील युद्धात २ मार्च रोजी ओढण्यात आले होते. ज्यावेळी हिझबुल्लाने इस्त्रायली शहरांच्या दिशेने क्षेपणास्त्र सोडली त्यानंतर इस्त्रायलने लेबनॉनवर हल्ला करण्यास सुरूवात केली. हिजबुल्ला हा इराण समर्थित एक प्रॉक्सी गट आहे. त्यांनी आयतोल्ला खामेनी यांची हत्या झाल्यानंतर इस्त्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागली होती.
इराणने याला प्रत्युत्तर देताना लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणावर एअर स्ट्राईक केला होता. या जीवघेण्या हल्यात जवळपास १५०० लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास १० लाख लोक विस्थापित झाले आहेत.
Related
Articles
सोलापूर विद्यापीठात समतेचा संदेश; 18 तासांचा अखंड वाचन-अभ्यास
13 Apr 2026
शेतकर्यांची फसवणूक करणार्या औषध कंपन्यांवर गुन्हे दाखल करा
10 Apr 2026
शहरात तब्बल ६२ किमीचे नवे मेट्रो मार्ग
11 Apr 2026
होर्मुझ नाकेबंदीचा निर्णय धोकादायक
15 Apr 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
09 Apr 2026
सोन्याच्या दरात घसरण
11 Apr 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात पावसाची विश्रांती
2
अमेरिका-इराणमध्ये युद्धविराम
3
चाळीस दिवसांनंतर इराकचे आकाश पुन्हा खुले
4
सावध पवित्रा (अग्रलेख)
5
युद्ध (अल्प) विराम (अग्रलेख)
6
अवकाळीचा असह्य फटका