तीन राज्यांतील प्रचार संपला   

उद्या मतदान

नवी दिल्ली : आसाम, केरळ आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता प्रचार संपला. या तिन्ही राज्यांत उद्या (गुरूवारी) मतदान होणार आहे.आसाम विधानसभेच्या १२५, केरळच्या १४० आणि पुद्दुचेरीच्या ३० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.या तीन राज्यांखेरीज पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतही विधानसभा निवडणुका होत आहेत. तामिळनाडूत सर्व २३४ जागांसाठी एकाच टप्प्यात २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पश्चिम बंगालच्या २९४ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील १५२ जागांसाठी २३ एप्रिल रोजी आणि दुसर्‍या टप्प्यातील १४२ जागांसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
 
याखेरीज, सात राज्यांत आठ जागांसाठी पोटनिवणुका होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील बारामती आणि राहुली विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. पोटनिवडणुकांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.या सर्व निवडणुकांचे निकाल ४ मे रोजी मतमोजणीनंतर जाहीर होणार आहेत.

Related Articles