मणिपूरमध्ये सुरक्षा दलाच्या छावणीवर जमावाचा हल्ला   

गोळीबारात २ ठार; पाच जखमी

मोइरांग : मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलाच्या छावणीवर जमावाने हल्ला केला. त्यावेळी गोळीबारात दोन जण ठार झाले तर पाच जण जखमी झाले, अशी माहिती मणिपूरचे गृहमंत्री गोविंदस कोंथौजम यांनी दिली.यावेळी गृहमंत्री कोंथौजम म्हणाले की, मोइरांग त्रोंगलाओबी परिसरात संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला. त्याविरोधात तरुण आणि महिलांनी जोरदार निदर्शने केली. त्रोंगलाओबीपासून २०० मीटर अंतरावर असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या छावणीवर जमावाने अचानक हल्ला केला. तसेच, तोडफोड करत छावणीतील वाहने जाळली. त्यावेळी जवानांनी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला. दुर्दैवाने, या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले, असे सांगितले.

Related Articles