E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
दहा हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द
Samruddhi Dhayagude
08 Apr 2026
नवी दिल्ली : पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडाल्यापासून भारतीय विमान कंपन्यांना दहा हजाराहून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत, अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने मंगळवारी दिली.भारतीय विमान कंपन्या युरोप आणि अमेरिकेकडे दररोज ३०० ते ३५० विमानांच्या फेर्या चालवत असत. मात्र, सध्या अवघ्या ८़० ते ९० फेर्या सुरू आहेत. दररोज १५० हून अधिक फेर्या रद्द झाल्या आहेत, असे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सहसचिव असंगबा चुबा आओ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
२८ फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर संयुक्त हल्ला केला. त्यानंतर, इराणने इस्रायलसह आखाती देशातील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले. मागील ३९ दिवसांपासून पश्चिम आशियात संघर्ष कायम आहे.इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. त्यामुळे खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची जागतिक वाहतूक विस्कळीत झाली आहे. सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिका इराणला वारंवार धमकी देत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. जेट विमानाच्या इंधनातदेखील वाढ झाली आहे.
इस्रायल, जॉर्डन, लेबनॉन, कुवेत, कतार, बहरीन आणि संयुक्त अरब अमिरातीसह पश्चिम आशियातील अनेक देशांनी हवाई क्षेत्र बंद केले आहेत किंवा कठोर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांना लांबला प्रवास करावा लागत आहे. त्याचा आर्थिक फटका प्रवाशांना बसत आहे.
Related
Articles
प्रसंगी सोलापूर बंद करू; पण न्याय मिळवू
15 Apr 2026
खत टंचाईवर ग्रीन अमोनियाचा पर्याय
11 Apr 2026
आरोग्यसेवेसाठी ‘जायका’कडून ३ हजार ७०८ कोटी
14 Apr 2026
चंद्रावरील विवरांना आमच्या प्रियजनांची नावे द्या
10 Apr 2026
वाचक लिहितात
15 Apr 2026
‘हिट अँड रन’ प्रकरणातील आरोपीला 24 तासांत अटक
12 Apr 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात पावसाची विश्रांती
2
अमेरिका-इराणमध्ये युद्धविराम
3
सावध पवित्रा (अग्रलेख)
4
अवकाळीचा असह्य फटका
5
महागाई उंबरठ्यावर!
6
एकतर्फी पोटनिवडणूक (अग्रलेख)