पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेवर आल्यास घुसखोरांना हाकलून देणार   

आसामच्या सभेत अमित शहा यांचा इशारा 

पाथरखांडी (आसाम) : पश्चिम बंगालमध्ये बदल निश्चित होणार आहे. भाजपची सत्ता आल्यास सर्व घुसखोरांना देशाबाहेर हाकलून दिले जाईल, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी दिला.
 
आसाममधील पाथरखांडी येथील निवडणूक मेळाव्यात ते बोलत होते. त्यांनी आरोप केला की, काँग्रेसने आसामच्या बराक खोर्‍यात बेकायदा घुसखोरांना आश्रय दिला होता. त्या माध्यमातून श्रीभूमी, सिलचर आणि काचर जिल्ह्यात घुसखोरी वाढण्यास चालना दिली होती. कायद्यामुळे घुसखोरांचे काय होईल, मतपेटी धोक्यात येईल, या भीतीमुळे काँग्रेसने नागरिकत्व सुधारणा कायद्यालाला (सीएए) नेहमीच विरोध केला. कायद्यानुसार बांगला देशात छळ होणार्‍या हिंदू धर्मीयांना मायदेशात येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. या बाबीला देखील विरोध करण्यात आला. या उलट मुस्लिम धर्मीय घुसखोरांचे पायघड्या घालून काँग्रेसने स्वागत केले, अशी जोरदार टीका त्यांनी केली.
 
भारत धर्मशाळा नाही, घुसखोरांना देशात कोणतेही स्थान मिळणार नाही, त्यांना त्यांच्या मायदेशात परत पाठवले जाईल, असे सांगताना ते म्हणाले, घुसखोरांच्या मतांच्या मदतीने काँग्रेस सत्तेवर येण्याचे स्वप्न पाहात आहे. पण, राहुल बाबा यांनी लक्षात घ्यावे की, तुमच्या तीन पिढ्यांनी प्रयत्न करूनही  आसाम ही घुसखोरांची भूमी बनलेली नाही. 
 
हैलाकांडी येथील सभेत शहा यांनी दावा केला की, आसाममधील मुस्लिम धर्मीय विद्यार्थ्यांसाठी काँग्रेसने ७०० मदरसे उभारले. त्यापैकी ४०२ मदरशांचे रूपांतर भाजपने प्राथमिक शाळेत केलेे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता आधुनिक शिक्षण मिळत आहे. राहुल यांच्याकडे पक्षाची धुरा आल्यानंतर काँग्रेसने सार्वजनिक जीवनाबाबतचे कायदे रोखले, असा आरोपही त्यांनी केला. केरळच्या मतदारांची तुलना करताना मल्लिकार्जुन खर्गे हे गुजराती मतदार अडाणी असल्याचे विधान करतात. तसेच भाजप आणि संघ साप असल्याचा आरोपही करत आले आहेत. एकंदरीत राहुल यांच्यामुळे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची सार्वजनिक जीवनातील पातळी प्रचंंड घसरली. या वेळी त्यांनी दिल्लीत आयोजित एआय समिटमधील काँग्रेस कायकर्त्यांनी घातलेल्या गोंधळाचे उदाहरण दिले. कपडे काढून आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांचा गौरव त्यांनी शूर सिंह असा केला होता. त्यातून काँग्रेसच्या विचारांची पातळी किती घसरली आहे, हे दिसून येते, असे ते म्हणाले.
 

Related Articles