E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
दक्षिण महाराष्ट्रासह मराठवाड्यात पुन्हा पाऊस
Wrutuja pandharpure
08 Apr 2026
पुणे
: मागील आठवड्यात राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस पडला. त्यानंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत दक्षिण महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने मंगळवारी वर्तविला आहे.
मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाला पोषक असलेली स्थिती निवळली आहे. त्यामुळे आज (बुधवार) पासून गोव्यासह संपूर्ण राज्यात दोन दिवस हवामान कोरडे असणार आहे. त्यानंतर दोन दिवसांत दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्हे व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विविध प्रकारच्या पीकांचे नुकसान होणार आहे.
पुढील दोन दिवसांत गोव्यासह संपूर्ण राज्यातील कमाल तपमानात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. त्यानंतर मात्र कमाल तपमानात कोकण, गोवा, मराठवाड्यात २ ते ३ अंशाने हळुहळू वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भात ३ ते ५ अंशाने वाढ होणार आहे. त्यामुळे उर्वरित राज्याच्या तुलनेत विदर्भात मात्र कडाक्याचे ऊन वाढणार आहे.गेल्या चार दिवसांपासून राज्यात काही भागात ढगाळ वातावरण, तर काही भागात ऊन असे चित्र आहे. त्यामुळे कोरड्या व दमट वातावरणामुळे काही भागात उकाडाही वाढला आहे.
पुण्यातील तपमानात वाढ
मागील तीन दिवसांपासून शहरातील पाऊस थांबला आहे. त्यामुळे दुपारी ऊन पडत असून सायंकाळी मात्र आकाश अंशत: ढगाळ होत आहे. पुणे व परिसरात पुढील ४ ते ५ दिवस आकाश मुख्यत: नीरभ्र राहणार असल्याचा अंदाज आहे. काल शहरात ३४.८ अंश कमाल, तर १९.८ अंश किमान तपमानाची नोंद झाली. पुढील आठवड्यात शहरातील तपमानात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Related
Articles
पश्चिम आशियातील युद्धाचा बेबी कॉर्न निर्यातीवर परिणाम
14 Apr 2026
'मीशो' शेअर्सची ९० मिनिटांत सुमारे ३.४ कोटी खरेदी-विक्री
09 Apr 2026
तृणमूलचे सिंडिकेट राज संपुष्टात येईल
11 Apr 2026
रिलशूट करताना तरुणीचे नुकसान
15 Apr 2026
सोलापुरात गॅस टंचाईाविरोधात महिलांचा जिल्हा परिषदेसमोर एल्गार !
10 Apr 2026
पश्चिम आशियावर आजपासून पाकिस्तानात चर्चा
10 Apr 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात पावसाची विश्रांती
2
अमेरिका-इराणमध्ये युद्धविराम
3
चाळीस दिवसांनंतर इराकचे आकाश पुन्हा खुले
4
सावध पवित्रा (अग्रलेख)
5
अवकाळीचा असह्य फटका
6
महागाई उंबरठ्यावर!