E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
काँग्रेसचे नेते पवन खेडा यांच्या दिल्लीतील घराची झडती
Samruddhi Dhayagude
08 Apr 2026
मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आरोप केल्यामुळे पोलिसांची कारवाई
नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हेमंत सर्मा बिस्वा यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी काँग्रेसचे नेते पवन खेडा यांच्या दिल्लीतील घराची झडती घेतली. या झडतीचे वर्णन काँग्रेसने चेटकिणीचा शोध असे केले आहे. सर्मा यांच्या पत्नीकडे एकाहून अधिक पासपोर्ट आहेत. तसेच बेनामी मालमत्ता असल्याचा आरोप खेडा यांनी नुकताच केला होता. त्यामुळे या आरोपाची शहानिशा आणि चौकशी आणि घराची झडती घेण्यासाठी पोलिसांचे पथक खेडा यांच्या घरी पोहोचले होते. आसामचे पोलिस महासंचालक दिबज्योती नाथ यांनी सांगितले की, खेडा यांच्या घरात काहीही सापडले नाही. झडतीत एक इलेक्ट्रॉनिक उपकरण जप्त केले आहे. गुन्हेगारी सदृश्य साहित्य सापडले आहे. मात्र, त्याचा तपशील त्यांनी दिला नाही. गुवाहाटी येथील गुन्हे विभागात खेडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, सर्मा यांच्या पत्नी रिंकी भुयान सर्मा यांच्याकडे अनेक पासपोर्ट आणि परदेशात मालमत्ता आहेत. त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात जाहीर केली नाही, असा आरोप खेडा यांनी केला होता. यानंतर मुख्यमंत्री सर्मा यांनी कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा रविवारी पत्रकार परिषद घेऊन दिला होता. सूत्रांनी सांगितले की, पोलिसांचे पथक काल सकाळी खेडा यांच्या मध्य दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील घरात पोहोचले होते. दोन तासांनंतर ते निघून गेले. काँग्रेसने झडतीवर टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ९ एप्रिल रोजी आसाममध्ये मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घराची झडती घेत राज्य यंत्रणेचा गैरवापर केला आणि विरोधकांचा आवाज दाबला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री सर्मा यांनी खेडा यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून कुटुंबावर बेछूट आरोप केले आहेत. यानंतर ते पसार झाले आहेत. त्यांना पातळातून हुडकून काढून त्यांची कसून चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले होते. अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक येत असल्याचे समजताच खेडा यांनी हैदराबादकडे पळ काढला आहे, असेही ते एका सभेत म्हणाले. दरम्यान, पोलिस अधिकार्यांनी सांगितले की, खेडा सध्या कोठे आहेत ? याची माहिती नाही. पण, त्यांचा शोध घेतला जात आहे.
Related
Articles
इस्रायलचा लेबनॉनमध्ये हवाई हल्ला!
09 Apr 2026
अमेरिकेशी खेळ नको...
11 Apr 2026
अतिरिक्त खेळाडूंना मैदानामध्ये प्रवेश करण्यास बीसीसीआयची मनाई
10 Apr 2026
अहमदाबादमध्ये ९६ जणांना विषबाधा
10 Apr 2026
पश्चिम बंगालचा पंधरा वर्षांत सत्यानाश
14 Apr 2026
संजू सॅमसनचे शतक
12 Apr 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात पावसाची विश्रांती
2
अमेरिका-इराणमध्ये युद्धविराम
3
चाळीस दिवसांनंतर इराकचे आकाश पुन्हा खुले
4
सावध पवित्रा (अग्रलेख)
5
अवकाळीचा असह्य फटका
6
महागाई उंबरठ्यावर!