E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
चीनने आपत्तीतही साधली संधी
Wrutuja pandharpure
08 Apr 2026
वृत्तवेध
मध्यपूर्वेत वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडत असताना, जागतिक ऊर्जा संकटाचा धोका डोळ्यासमोर उभा आहे. अशा वेळी ‘आपत्तीमध्ये संधी’ कशी निर्माण केली जाते, हे चीनच्या रणनीतीतून समजते. मध्यपूर्वेत वाढत्या तणावामुळे आणि होर्मुज सामुद्रधुनीत येथे अडथळा निर्माण होण्याची शक्यता वाढल्यामुळे जगभरात चिंता वाढली आहे आणि मोठ्या ऊर्जासंकटाचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे, चीन या परिस्थितीचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे.
‘ब्लूमबर्ग’च्या अहवालानुसार, जागतिक तेल संकट लक्षात घेता अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांमध्ये अंशतः सवलत दिली आहे. अमेरिकेने 30 दिवसांची तात्पुरती सूट देत इराणला मर्यादित प्रमाणात तेल विक्री करण्याची ‘परवानगी’ दिली आहे. यानंतर चीनच्या सरकारी तेल कंपन्या या संधीचा फायदा घेत इराणकडून तेल खरेदीसाठी नवीन करारांचा विचार करत आहेत. चीनकडून इराणसोबत संभाव्य तेल करार अशा वेळी होत आहे, जेव्हा मध्यपूर्वेत तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती उच्च पातळीवर टिकून आहेत. या तात्पुरत्या सवलतीनंतर आशियाई खरेदीदारांसाठी आशेचा एक किरण निर्माण झाला आहे. मीडिया अहवालांनुसार, चीनच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पांनी इराणसोबत चर्चा सुरू केली आहे. ही प्रक्रिया अजून प्रारंभिक टप्प्यात आहे. दुसरीकडे, इराणच्या तेल कंपन्याही मध्यस्थांच्या माध्यमातून आशियाई रिफायनर्यांशी संपर्क साधून निर्यातीसाठी पर्याय शोधत आहेत.
कच्च्या तेलाचा सर्वांत मोठा आयातदार
अलीकडील वर्षांमध्ये इराणी तेलाचा सर्वांत मोठा खरेदीदार चीनच राहिला आहे. त्यामुळे अमेरिकन निर्बंधांमध्ये सवलत मिळाल्यानंतर इराणच्या तेल बाजारात खरेदीदारांची संख्या वाढू शकते. त्यामुळे स्पर्धाही तीव्र होईल. मर्यादित पुरवठा आणि वाढती मागणी यामुळे किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. तथापि, तज्ज्ञांच्या मते हा संभाव्य करार चीनसाठी तीन स्तरांवर महत्त्वाचा ठरेल. किमतींचा समतोल राखणे, ऊर्जा पुरवठ्याची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि यासंबंधित राजकीय जोखमींचे व्यवस्थापन करणे या तीन बाबींना करारात महत्त्व आहे.
Related
Articles
विमानाच्या इंधनाचे दर वाढले
14 Apr 2026
रिलशूट करताना तरुणीचे नुकसान
15 Apr 2026
आसाममध्ये हिंसाचारात ३० जखमी; सात जणांना अटक
10 Apr 2026
राहुरी बसस्थानकात स्वच्छतागृहांची दुरवस्था; प्रवासी त्रस्त
09 Apr 2026
समाजाशी समन्वय साधणारा खरा साहित्यिक : प्रा. पाटील
12 Apr 2026
अशोक खरातचा एन्काउंटर होण्याचा संशय : प्रणिती शिंदे
15 Apr 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात पावसाची विश्रांती
2
अमेरिका-इराणमध्ये युद्धविराम
3
सावध पवित्रा (अग्रलेख)
4
अवकाळीचा असह्य फटका
5
महागाई उंबरठ्यावर!
6
एकतर्फी पोटनिवडणूक (अग्रलेख)