पश्‍चिम आशियातील युद्धामुळे शेअर बाजार घसरला   

मुंबई : पश्‍चिम आशियात भडकलेल्या युद्धाचे पडसाद भारतीय शेअर बाजारावर सोमवारी उमटले. पश्‍चिम आशियातील तणाव आणि खनिज तेलाच्या किंमती वाढल्या. सेन्सेक्स आणि निफ्टीत एक टक्क्यांनी घट झाली.
 
सेन्सेक्स प्रारंभी 3.37 टक्क्यांनी अर्थात 78 हजार 544 वर आणि नंतर दिवसभरात 1.29 टक्क्यांनी अर्थात 1 हजार 49 ने घसरुन 80 हजार 544 वर बंद झाला. निफ्टीत 2.28 टक्क्यांनी अर्थात 576 ने प्रथम घसरुन 24 हजार 604 पर्यंत पोहोचला होता. सरतेशेवटी तो 1.24 टक्क्यांनी अर्थात 313 घसरुन 24 हजार 867 वर बंद झाला. इंटरग्लोब एव्हिएशन, लार्सन अँड ट्रुब्रो, अदानी पोर्ट्स, मारुती, एशियन पेंट्स आणि बजाज फिनसेर्व्ह यांच्यासह अनेक कंपन्यांचे समभागांचे मूल्य घटले. या उलट भारत इलेक्ट्रॉनिक्स, सन फार्मा आणि आयटीसी कंपन्यांच्या समभागांचे मूल्य वाढले. जागतिक खनिज तेल ब्रेंट क्रूडच्या निर्देशांक 8.34 टक्क्यांनी वाढला. एका पिंपाचा दर 78.95 डॉलर एवढा झाला. 
 
आशियातील जपानचा निर्देशांक एक टक्क्यांनी, हाँगकाँगचा निर्देशांक दोन टक्क्यांनी, चीनच्या शांघाय शेअर बाजारातील निर्देशांक सकारात्मक वातावरणात बंद झाला. दक्षिण कोरियाच्या बाजाराला सुट्टी होती. युरोपचा बाजार घसरुन बंद झाला. अमेरिकेतील बाजारातील वातावरण नरम होते.   दरम्यान, परदेशी संस्थात्मक गुंतवणूक शुक्रवारी  7 हजार 536 कोटींची झाली. देशांतर्गत गुंतवणूक 12 हजार 293 कोटींची झाली. 

Related Articles