खनिज तेलाच्या दरात नऊ टक्के वाढ   

युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनी बंद पडण्याचा धोका

न्यूयॉर्क : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्‍ले अधिक तीव्र केले आहेत. त्याचे मोठे परिणाम  इराणजवळील पर्शियन आखातातील होर्मूझ सामुद्रधुनीतून जागतिक खनिज तेलाची मोठी वाहतूक केली जाते.. त्यावर बंधने येणार आहेत. पर्यायाने पुरवठा साखळी विस्कळित होण्याचा धोका देखील वाढला आहे. खनिज तेलाचे दर वेगाने आता वाढू लागले आहेत. 
 
युद्ध आणखी भडकले तर इराण किंवा मध्य पूर्वेतून खनिज तेलाची आयात कशी करायची ?असा प्रश्‍न व्यापार्‍यांना पडला आहे.  पुरवठा कमी होत तो हळूहळू बंद पडण्याची अधिक चिन्हे आहेत. इराणजवळील पर्शियन आखातातील होर्मूझ सामुद्रधुनीतून प्रामुख्याने खनिज तेलाची वाहतूक केली जाते. समुद्र वाहतुकीचा हा चिंचोळा मार्ग आहे. युद्धामुळे या परिसरात हल्‍ले अधिक तीव्र झाले  तर हा मार्ग पूर्णपणे बंद होणार आहे. पर्यायाने  या मार्गाने होणार्‍या खनिज तेलाच्या पुरवठ्याचे संकट निर्माण होणार आहे. खनिज तेल, नैसर्गिक वायूचे दर आणखी भडकण्याची शक्यता आहे.
 
अमेरिकेतील खनिज तेलाचा दर प्रति पिंपाचा दर काल 72.79 डॉलर होता. शुक्रवारी त्याचा दर 67 डॉलर होता. त्यात 8.6 टक्क्यांनी वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय श्रेणीतील ब्रेंट क्रूडच्या एका पिंपाचा दर काल 79.41 डॉलर होता. शुक्रवारी एका पिंपासाठी 72.87 डॉलर्स द्यावे लागत होते. त्यात आता नऊ टक्के वाढ झाली. गेल्या सहा महिन्यांत प्रथमच एवढी वाढ दिसून आली.एकंदरीत जागतिक ऊर्जा संसाधनाचे दर वाढले तर सामान्य ग्राहकांच्या खिशावर आर्थिक बोजा पडणार आहे. खनिज तेलाचे दर वाढले की., किराणा मालाचे दरही वाढणार आहेत. पयार्र्याने महागाईत भर पडणार आहे. 
 
हार्मोझ सामुद्रधुनीवर इराणचे वर्चस्व आहे. या भागातून दररोज 20 टक्के अर्थात 15 लाख खनिज तेलाच्या पिंपाची वाहतूक होते. रायस्टॅड एनर्जीच्या मते. उत्तरेला इराणच्या सीमेला लागून असलेल्या सामुद्रधुनीतून प्रवास करणारे तेलाचे टँकर हे सौदी अरेबिया, कुवेत, इराक, कतार, बहरीन, यूएई आणि इराण येथून तेल आणि वायू घेऊन जातात. इराणने फेब्रुवारीपासून हा मार्ग तात्पुरता बंद केला होता. या परिसरात लष्करी कवायती करणार असल्याने तसा निर्णय घेतल्याचे जाहीर केल होते. त्यामुळे काही दिवसांत खनिज तेलाचे दर सहा टक्क्यांनी वाढले. 
 
ओपेक देशांनी उत्पादन वाढवले
 
जागतिक खनिज तेलाचे उत्पादन करणार्‍या आठ देशांनी (ओपेक संंघटना) यांनी रविवारी उत्पादन वाढवण्याची घोषणा केली. युद्ध सुरू होण्यापूर्वी त्यांनी याबाबत बैठक घेतली होती. त्यात एप्रिलमध्ये दररोज 2 लाख 6 हजार पिंपांचे उत्पादन  वाढवणार असल्याचे म्हटले होते. विश्‍लेषकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त होते.  उत्पादन वाढवणार्‍या देशांमध्ये सौदी अरेबिया, रशिया, इराक, संयुक्त अरब अमिराती, कुवेत, कझाकस्तान, अल्जेरिया आणि ओमान यांचा समावेश आहे.
 
जागतिक तेल पुरवठ्याचा सुमारे एक पंचमांश भाग होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जातो. जो जागतिक व्यापारासाठी एक महत्त्वाचा मार्ग आहे, याचा अर्थ बाजारपेठा कागदोपत्री ठरविल्याच्या क्षमतेपेक्षा अधिक पिंपांची निर्मिती करु शकतात. मात्र, त्याबाबत आता त्या चिंतेत पडल्या आहेत, असे  रायस्टॅडचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि भू-राजकीय विश्‍लेषक प्रमुख जॉर्ज लिओन यांनी एका ईमेलमध्ये म्हटले आहे. आखातातून होणारा प्रवाह मर्यादित असेल, तर अतिरिक्त उत्पादन पुरवठा साखळी सुरू ठेवण्यास पर्याय ठरु शकेल. 
 
इराण दररोज सुमारे 1 लाख 60 हजार तेलाच्या पिंपाची निर्यात क़रतो.  बहुतेक चीनला निर्यात केले जाते जर इराणची निर्यात विस्कळीत झाली तर पुरवठ्यासाठी इतरत्र शोध घ्यावा लागू शकतो, हे आणखी एक कारण आहे जे ऊर्जेच्या किमती वाढवू शकते. तथापि, चीनकडे भरपूर खनिज तेलाचे साठे आहेत. रशियाकडून तो त्यांची आयात देखील वाढवू शकतो, असे विश्‍लेषकांनी म्हटले आहे.

Related Articles