लेबनॉनवर इस्रायलचा हल्ला   

३१ जण ठार 

दुबई/ तेल अवीव : हिजबुल्लाने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर लेबनॉनवर इस्रायलने हवाई हल्ले केले. या हल्ल्यात 31 जण ठार झाले आहेत, असे लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले.अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर इराणच्या समर्थनार्थ हिजबुल्ला युद्धात उतरला आहे. त्यामुळे युद्ध आणखी चिघळणार आहे.इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 31 जण ठार झाले असून 149 जण जखमी झाले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.  याआधी, हिजबुल्लाने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केला होता. मात्र, इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणालीने ती नष्ट केली. त्यानंतर, इस्रायलने हिजबुल्लाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी दक्षिण उपनगर आणि दक्षिण लेबनॉनला लक्ष्य बनविले आहे.

Related Articles