विनापरवाना पोस्टर लावणार्‍यावर महापालिकेची कारवाई   

अहिल्यानगर : शहरातील उड्डाणपुलाच्या खांबांवर विनापरवाना जाहिरातीचे पोस्टर लावून मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांत एका डेव्हलपरवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.
 
महापालिकेचे प्रभाग अधिकारी (प्रभाग समिती 2) शेख चाँद यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रविवारी सकाळी 10च्या सुमारास स्टेशन रस्त्यावरील मार्केटयार्ड चौक ते कोठी चौकादरम्यान उड्डाणपुलाच्या खांबांची पाहणी सुरू असताना एका खांबावर रांजणगाव-कारेगाव एमआयडीसीमध्ये प्लॉट विक्रीची जाहिरात विनापरवाना लावल्याचे आढळले. या घटनेची माहिती डांगे यांना दिल्यानंतर त्यांनी त्वरित याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. 

Related Articles