E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
'ती'ची कर्तबगारी महिला दिन विशेष
संगमनेरच्या औद्योगिक वसाहतीचे काम लवकरच मार्गी : विखे
Wrutuja pandharpure
03 Mar 2026
संगमनेर
(वार्ताहर) : तालुक्यात राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे वेगाने पूर्ण होत आहेत. भविष्यात तालुक्यात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक वसाहतीचे कामही लवकरच मार्गी लावले जाईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांनी दिली.
तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सुमारे 1 कोटीच्या निधीतून ऊर्ध्व प्रवरा उजव्या कालव्यावरील ’एस्केप’मधून पाणी सोडण्याच्या व पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पथदिव्यांच्या कामाचा शुभारंभ विखे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार अमोल खताळ, पदाधिकारी कपिल पवार, रामभाऊ रहाणे, प्रमोद रहाणे, काशिनाथ पावसे, गुलाब भोसले, राम जाजू, जनार्दन आहेर यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
विखे म्हणाले, निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाल्याने सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यंदा मुबलक पाणी उपलब्ध असले तरी ’अल निनो’च्या संभाव्य धोक्यामुळे जून महिन्यातील पावसाच्या प्रमाणावर धरणातील पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. राज्यातील सर्वच धरणांतील पाण्याचा 31 ऑगस्टपर्यंतचा आढावा विभागाच्यावतीने घेण्यात येत आहे. आवर्तनाचे नियोजन योग्यप्रकारे झाल्यामुळे यंदा तालुक्यात टँकरची मागणी नाही.
राज्य शासन तालुक्याच्या विकासासाठी खंबीरपणे उभे आहे. हिवरगाव पावसा येथील बंधार्यात आलेले पाणी व सुमारे 3 कोटीच्या पुलाचे काम परिसरासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विकासाच्या माध्यमातून तालुका प्रकाशमान होत असून, राज्य शासनाची भूमिका जनहितासाठी कटिबद्ध आहे.आमदार खताळ म्हणाले, पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न सुटत आहेत. चंदनापुरी ते शिरापूर रस्त्यावरील पुलाचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून मार्गी लागले आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक वसाहतीसाठी जागेचा प्रश्नही लवकरच निकाली काढण्यात येईल.
Related
Articles
इराणच्या बेटावरील लष्करी स्थळांवर अमेरिकेचा बॉम्बहल्ला
15 Mar 2026
बोलूच दिले जात नाही; सभागृह संपूर्ण देशाचे
12 Mar 2026
मालवलीमध्ये ‘तिसर्या’ डोळ्याची करडी नजर
11 Mar 2026
नॉर्वेत अमेरिकन दूतावासाबाहेर स्फोट
09 Mar 2026
इराणमधील १६५ विद्यार्थिनींचे बळी अमेरिकेच्या सैन्यामुळे
10 Mar 2026
गॅस तुटवड्यामुळे चुली पेटल्या
14 Mar 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अमिरातीवर इराणचा हल्ला
2
क्युबाचे सरकार कोसळणार
3
निम्या राज्यात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता
4
सीतेला पटली हनुमानाची ओळख
5
गॅस वाटपाच्या निकषात बदल
6
लेबाननवरील हल्ल्याला हिजबुल्लाकडून कडवा प्रतिकार