जामखेड येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाला जरांगे यांची भेट   

जामखेड (वार्ताहर) : शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या अनधिकृत अतिक्रमण व कामातील अनियमिततेविरोधात सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांचे गेल्या 5 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू असून, त्यास काल (सोमवारी) संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांनी भेट देवून पाठिंबा दिला.गेल्या 6 दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणामागील भूमिका जाणून घेतल्यानंतर जरांगे म्हणाले, हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असून, मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे. वाढती अनधिकृत अतिक्रमणे तातडीने हटवली गेली पाहिजेत.
 
संबंधित अधिकार्‍यांसोबत आजच विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची बैठक होणार असल्याची माहिती मिळाली असून, त्या बैठकीतील निर्णयानुसार पुढील भूमिका जाहीर केली जाईल. मुख्यमंत्र्यांशी मी बोलतो. मात्र, शहरातील रस्त्यालगतची अनधिकृत अतिक्रमणे काढलीच पाहिजेत. नागरिकांच्या पाठीशी मी ठाम उभा असल्याचे जरांगे म्हणो.
 
या आंदोलनात सर्वच राजकीय पक्षांबरोबर शहर बचाव कृती समिती, मुस्लिम पंचकमिटी, तालुका वकील संघ, वंचित बहुजन आघाडी, त्रिदल माजी सैनिक संघटना, डॉक्टर संघटना, संभाजी ब्रिगेड, जिव्हाळा फौंडेशन, ज्येष्ठ नागरिक संघ आदी संघटनांसह नागरिक सहभागी झाले आहेत.उपोषणस्थळी पत्रकार गंगाधर काळकुटे, प्रा. शहाजी डोके, रंगनाथ राळेभात, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, विकास राळेभात, शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, मंगेश आजबे, प्रदीप टापरे, नगरसेवक आश्रू शेळके आदी उपस्थित होते.

Related Articles