E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
'ती'ची कर्तबगारी महिला दिन विशेष
संपादकीय
माध्यमे आणि तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये मोठी रोजगारकपात
Wrutuja pandharpure
03 Mar 2026
वृत्तवेध
जगभरात नोकरीचे संकट वाढत चालले आहे. ‘मीडिया आउटलेट्स’पासून जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कपात होत आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने आपल्या न्यूजरूम आणि आंतरराष्ट्रीय टीममध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि खर्च नियंत्रणाच्या नावाखाली तंत्रज्ञान उद्योगात लाखो नोकर्यांवर गंडांतर येत आहे. ताज्या कपातीचा ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंग टीमवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. संपूर्ण पश्चिम आशिया टीमला कामावरून काढून टाकण्यात आले आहे, तर दिल्ली, बीजिंग, कीव, लॅटिन अमेरिका आणि बर्लिनसारखे प्रमुख आंतरराष्ट्रीय ब्युरो बंद करण्यात आले आहेत किंवा कर्मचारी कमी करण्यात आले आहेत. जेरुसलेम ब्युरो चीफ गेरी शिह यांनी ‘एक्स’वर लिहिले आहे, की जगभरात सात वर्षं केलेले रिपोर्टिंग हा आपल्या आयुष्यातील सर्वात खास अनुभव आहे. त्यांनी लिहिले, की आज एक दुःखद दिवस आहे; परंतु आम्ही प्रामाणिक पत्रकारिता केली. 2025 मध्ये जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांनी एकूण एक लाख वीस हजार लोकांना कामावरुन कमी केले. ही कपात कोणत्याही एका देशापुरती मर्यादित नव्हती, तर चिप उत्पादन, आयटी सेवा, टेलिकॉम, क्लाउड आणि सॉफ्टवेअरसह प्रत्येक क्षेत्रांमध्ये अनुभवायला मिळाली. तज्ज्ञांच्या मते, मुख्यत्वे खर्च नियंत्रण, व्यवसाय पुनर्रचना आणि मानवी श्रमापेक्षा ऑटोमेशनला प्रोत्साहन देणार्या ‘एआय’वर वेगाने वाढणारे लक्ष यामुळे हे झाले आहे.
‘इंटेल’ या सेमीकंडक्टर दिग्गज कंपनीने 2025 मध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी कर्मचारी कपात केली. कंपनीने अंदाजे 24 हजार कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले. ही कारवाई तिची आर्थिक परिस्थिती स्थिर करण्यासाठी आणि स्वतःला फाउंड्रीकेंद्रित व्यवसाय मॉडेलमध्ये रूपांतरित करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून केल्याचे सांगण्यात आले. वाढती स्पर्धा आणि मोठ्या गुंतवणुकीच्या खर्चामुळे कंपनीवर दबाव वाढला होता. ‘टीसीएस’ या भारतातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनीने अंदाजे 20 हजार कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले. कंपनीने याचे कारण कौशल्य असंतुलन आणि ‘एआय’ आधारित डिलिव्हरी मॉडेल्सचा अवलंब असल्याचे म्हटले आहे. ‘ऑटोमेशन’ आणि ‘जनरेटिव्ह एआय’च्या वाढत्या वापरामुळे पारंपारिक आयटी संस्थांची मागणी कमी झाली आहे. ‘व्हेरिझॉन’ या अमेरिकन टेलिकॉम कंपनीने खर्च कमी करून ‘ऑपरेशनल स्ट्रक्चर’ सोपे करण्यासाठी सुमारे 15 हजार नोकर्या कमी केल्या आहेत. कंपनी 5जी नेटवर्क आणि डिजिटल सेवांमध्ये गुंतवणूक वाढवत आहे. त्यामुळे जुन्या ऑपरेशनल भूमिका कमी होत आहेत. जागतिक सल्लागार आणि आयटी सेवा देणार्या ‘अॅक्सेंचर’ने सुमारे 11 हजार कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले आहे. कंपनी म्हणते, की ग्राहकांची मागणी पारंपारिक सल्लागार कंपनीकडून ‘जनरेटिव्ह एआय’ आणि ‘ऑटोमेशन’ प्रकल्पांकडे सरकत आहे.
Related
Articles
श्रीलंका क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गॅरी कर्स्टन यांची नियुक्ती
10 Mar 2026
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील संघर्ष पुन्हा उफाळला
14 Mar 2026
खनिज तेलाच्या दरवाढीमुळे अमेरिकेचा फायदा
14 Mar 2026
कर्जमाफीचे निकष लवकरच जाहीर करणार
12 Mar 2026
मुख्य निवडणूक आयुक्त कुमार यांना हटविण्यासाठी नोटीस
14 Mar 2026
सोलापुरात काँग्रेस पक्षाकडून गॅस सिलेंडर दरवाढ व तुटवड्याच्या विरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा !
11 Mar 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अमिरातीवर इराणचा हल्ला
2
क्युबाचे सरकार कोसळणार
3
निम्या राज्यात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता
4
सीतेला पटली हनुमानाची ओळख
5
गॅस वाटपाच्या निकषात बदल
6
लेबाननवरील हल्ल्याला हिजबुल्लाकडून कडवा प्रतिकार