E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
'ती'ची कर्तबगारी महिला दिन विशेष
रविवार केसरी
‘एआय’चे भवितव्य जोखणारी परिषद
Samruddhi Dhayagude
01 Mar 2026
विशेष : कस्तुरी पाठक
कृत्रिम बुद्धीमत्ता माणसांचा रोजगार हिरावून घेईल का? या तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील का? यावर चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीमध्ये एका मोठ्या कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदचे आयोजन करण्यात आले. ॒या परिषदेत एआयचे उपयोग, गैरवापर आणि नियमन यावर व्यापक चर्चा करण्यात आली.
काही वर्षांपूर्वी केवळ ठराविक क्षेत्रांपुरते मयादित असलेले एआय अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. थोडक्यात, आता आपण एआयला सरावलो आहोत. अशा वेळी एआयचे फायदे, उपयोग, संभाव्य धोके, नियमन आदी विषयांवर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विचारमंथन होणे गरजेचे होते. नेमका हाच धागा पकडून नवी दिल्लीमध्ये नुकतेच ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ या आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदचे आयोजन केले गेले. हा जगातील सर्वात मोठ्या एआय इव्हेंट्सपैकी एक मानला जात आहे. त्यात ‘ओपन एआय’चे (चॅटजीपीटी निर्माते) प्रमुख सॅम ऑल्टमन, गूगल/अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, अँथ्रोपिकचे सीईओ डॅरिओ अमोडी यांच्याबरोबरच अनेक स्टार्टअप्स आणि एआय प्रोडक्ट डेव्हलपर्स यांचा समावेश होता. त्याचबरोबर वीसहून अधिक देशांचे देशांचे प्रमुख, साठहून अधिक द्शांचे प्रतिनिधी, आणि पाचशेहून अधिक जागतिक एआय तज्ज्ञही या परिषदेला उपस्थित होते. शिवाय येथे ३०० हून अधिक कंपन्या आणि स्टार्टअप्सनी त्यांचे तंत्रज्ञान आणि एआय आधारित उत्पादनांचे प्रदर्शन केले.
परिषदेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे एआय क्षेत्रात विकसनशील देशांचा आवाज आणि प्रभाव वाढवणे, हे क्षेत्र केवळ अमेरिका किंवा युरोपीय समुदायापुरते मर्यादित राहू न देता विकसनशील देशांनाही एआय नियमन आणि उपयोगात भाग घेता यावा, वैश्विक नियम, नैतिकता, जबाबदार एआय, रोजगार आणि सामाजिक परिवर्तनाचा व्यापक विचार केला जावा,हे होते. एआय तंत्रज्ञान मानवासाठी उपयुक्त असले तरी त्याचे अनेक गंभीर धोकेही आहेत.
एआयचे समर्थन करणार्या तज्ज्ञांच्या मते हे तंत्रज्ञान मानवसेवेच्या क्षेत्रात सुधारणा करेल.एआयमुळे अनेक रोजगार जातील अशी भीती वाटत असली तरी एआयमुळे रोजगाराचे प्रकार बदलतील आणि अनेक नवे रोजगार अस्तित्वात येतील. एआय विरोधकांच्या मते एआयमुळे काही उद्योग आणि पारंपरिक कामे कमी होऊ शकतात,माहितीची सुरक्षितता आणि गुप्ततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अर्थात अद्याप तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर यासंदर्भात निश्चित नियमन नसल्याने एआयच्या दुरुपयोगाची मोठी भीती आहे. यामुळेच एआयचा वापर मानव कल्याणासाठी व्हावा, त्याच्या गैरवापरावर कडक निर्बंध असावेत अशी सगळ्यांचीच मागणी होती.
ही परिषद केवळ भारतातल्या संस्था किंवा उद्योजकांसाठी नव्हे, तर दक्षिण गोलार्धात असलेले विकसनशील देश आणि जागतिक समुदायासाठी महत्त्वपूर्ण संवादाचे एक केंद्र ठरले.े एकीकडे विविध कंपन्यांच्या एआय सेवा आणि उत्पादनांचे प्रदर्शन सुरू होते तर दुसरीकडे एकाच वेळी विविध दालनांमध्ये एआयशी संबंधित विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. सुमारे दीड तासाच्या चर्चासत्रांमध्ये तज्ज्ञांकडून उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरेही दिली जात होती. अशी चर्चासत्रे रोज दिवसभर सुरू होती. त्यामुळे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि रुची असणार्या मंडळींसाठी ही एक मोठी पर्वणी होती. या चर्चासत्रांमध्ये एआय आणि रोजगार, संधी आणि धोके, सुरक्षित आणि जबाबदार एआय, एआय आणि सर्वसमावेशक विकास, सुरक्षा आणि संरक्षणात ॒ýएआय असे अनेक विषय चर्चिले गेले.
यात तज्ज्ञांनी मुख्यत: एआयच्या उपयुक्ततेवर भर दिला. त्यांच्या मते ॒एआयमुळे उद्योगक्षेत्रात आणि रोजच्या कामात बदल तर होणार आहेत, पण एआय रोजगारांचे स्थान घेणार नाही, तर नवी कौशल्ये आणि संधी निर्माण करेल. काही तज्ज्ञांच्या मते एआयमुळे पारंपरिक नोकर्यांमध्ये बदल दिसून येईल आणि या बदलाशी जुळवून घेण्यासाठी नवी कौशल्ये आत्मसात करावी लागतील आणि त्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे.
या चर्चासत्रांमध्ये तज्ज्ञांनी एआयचा अवैध किंवा हानीकारक वापर होऊ नये, यासाठी जागतिक स्तरावर नियमन आणि मार्गदर्शक तत्त्वे बनवण्याचा आग्रह ठेवला. अर्थातच त्याला विविध राष्ट्रप्रमुख, राजकीय नेते आणि एआय कंपन्यांचे सीईओ आदींनी अनुमोदन दिले. यात विशेषत: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर एआयचा वापर कसा मर्यादित करायचा किंवा चुकीची माहिती कशी रोखायची, यावर सखोल चर्चा झाली. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ॒ýएआय कसे वापरता येईल, भाषा अनुवादाचे ॒ýएआय उपयोजन, ग्रामीण भागात ॒ýएआय आधारित सेवांचा वापर यावरही चर्चा करण्यात आली. भारतीय लष्कराने व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम, डीपफेक डिटेक्शन, एआय फेशियल रेकग्निशन सिस्टीम अशा ॒ýएआय आधारित प्रकल्पांचे विविध उपयोग सादर केले. या प्रकल्पांची भविष्यात सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनात मोठी मदत होऊ शकेल.
परिदेत विविध एआय सेवा, उत्पादने आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले. यात शिक्षणात एआयचे उपयोग, आरोग्यसेवांमध्ये ॒एआयचा वापर, सुरक्षा तंत्रज्ञान- डीपफेक शोध, चेहरे ओळख (फेशियल रेकग्निशन), वेहिकल ट्रॅकिंग, पर्यावरण आणि मशीन लर्निंग आधारित डेटा मॉडेल्स, व्यापार आणि कृषि, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रांमध्ये एआयचा उपयोग किती प्रभावी पद्धतीने करण्यात येत आहे, याची माहिती मिळाली. शिक्षणात तर भाषा अनुवाद, डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्म्स यासाठी एआयचा वापर होतच आहे, पण आरोग्यसेवांमध्येही एआय मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. एमआरआय, एक्स रे आणि विविध चाचण्यांच्या रिपोर्टसवरून एआयच्या मदतीने व्याधी निदान केले जात आहे. त्यात अचूकताही येत आहे सुरक्षा तंत्रज्ञानात डीपफेक शोधणे, फेशियल रेकग्निशन, वेहिकल ट्रॅकिंग यामुळे मानवी चुका होण्याची शक्यता खूपच कमी झाली आहे.
ऊर्जा व्यवस्थापन, हवामान अंदाज अशा क्षेत्रांमध्ये मशीन लर्निंग आधारित डेटा मॉडेल्सचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. हे आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये सुरू झालेला एआयचा वापर या प्रदर्शनात दिसून आला. विशेषत: डेटा अॅनॅलिसिस करावे लागणार्या क्षेत्रांसाठी तर एआय आणि मशिन लर्निंग वरदान ठरत आहे. एका कंपनीने क्रिकेट प्रशिक्षणात एआय किती महत्त्वाची भूमिका बजावू शकते, याचे प्रात्यक्षिक दाखवले. यात खेळाडूच्या गोलंदाजी किंवा फलंदाजीच्या शैलीचे चित्रीकरण करून एआयकडून विश्लेषण केले जाते. यात त्या खेळाडूच्या अगदी बारीक चुकाही दाखवल्या जातात आणि त्यात काय सुधारणा हवी आहे, ते सांगितले जाते. त्यामुळे प्रशिक्षकांचे आणि खेळाडूंचे काम सोपे होते. हे तंत्रज्ञान जनजीवनात विविध समस्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. पुरुष, स्त्री, युवा किंवा वृद्ध अशा सर्वांनाच एआयचा लाभ मिळू शकेल. ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ सर्वसमावेशक, जागतिक दृष्टिकोनातून ॒एआयचा उपयोग, धोके, नियम, सामाजिक परिणाम आणि करिअरच्या संधी याबद्दलची चर्चा करणारे मोठे व्यासपीठ ठरले. या समिटचा प्रभाव सुगम ॒एआय आणि एआय-एनेबल्ड भविष्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.
Related
Articles
घरगुती सिलिंडर हमखास मिळेल
14 Mar 2026
आंतरराष्ट्रीय विमानांच्या तिकिटात १५ टक्के वाढ
11 Mar 2026
तेरा वर्षे कोमात असलेल्या तरुणाला इच्छामरणाची परवानगी
12 Mar 2026
अजित पवार यांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी करण्यास सरकारला भाग पाडा
13 Mar 2026
आगामी अधिवेशनात महिला शेतकर्यांसाठी विशेष विधेयक
12 Mar 2026
ऊर्जा टंचाईचा ‘ताप’ (अग्रलेख)
12 Mar 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अमिरातीवर इराणचा हल्ला
2
क्युबाचे सरकार कोसळणार
3
निम्या राज्यात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता
4
सीतेला पटली हनुमानाची ओळख
5
गॅस वाटपाच्या निकषात बदल
6
लेबाननवरील हल्ल्याला हिजबुल्लाकडून कडवा प्रतिकार