अमेरिका-भारत व्यापार करार कृषी, दुग्ध क्षेत्राचे संपूर्ण संरक्षण : गोयल   

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारात भारतीय कृषी आणि दुग्ध क्षेत्राच्या हिताचे संपूर्णत: संरक्षण केले आहे, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले.
 
अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील प्रत्युत्तर शुल्क ५० टक्क्यावंरुन १८ टक्के नुकतेच केले.. त्या पार्श्वभूमीवर ते काल बोलत होते. अन्य स्पर्धक देशांचा विचार करता भारतावरील प्रत्युत्तर शुल्क कमी आहे. करारामुळे मेक इन इंडिया आणि डिझाइन इन इंडियाला चालना मिळणार आहे. तसेच मेक इन इंडिया अंतर्गत भारत स्वयंपूर्ण देखील होणार आहे. १८ टक्के प्रत्युत्तर शुल्क लागू केल्यामुळे मजूर आधारित उद्योगांच्या मालाच्या निर्यात वाढीला प्रोत्साहन मिळणार आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांत कौशल्यपूर्ण व्यक्तींना संंधीची मोठी दारे उघडी होणार आहेत. भारताच्या ऊर्जा सुरक्षेला सरकारने मोठे महत्त्व दिले आहे. हवाई वाहतूक, अणु ऊर्जासारख्या क्षेत्रांत अमेरिका अग्रेसर आहे. त्यामुळे या क्षेत्रांतील भारताच्या गरजा पूर्ण होतील. करार हा संपूर्णत: भारताच्या हिताचा असल्याचा दावा गोयल यांनी केला.

 

Related Articles