जपानमधील हिम वर्षावात ३५ नागरिकांचा मृत्यू   

टोकियो : जपानच्या उत्तर भागाला हिम वर्षावाचा तडाखा बसला आहे. जिकडे तिकडे बर्फ साचले आहे. रस्ते बंद आहेत. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून जनजीवन विस्कळींत झाले आहे. ३५ नागरिकांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. 
 
बुधवारी १५ प्रांतात दोन मीटर उंचीचे बर्फ साचल्याचे दिसून आले. आर्क्टिक येथून गार वारे जपानच्या दिशेने आले. त्यामुळे तुफानी हिम वर्षाव झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. १७ हजारांहून अधिक घरांचा वीजपुरवठा बंद पडला आहे. रेल्वेगाड्यांची वाहतूक बंद आहे. त्यामध्ये बुलेट ट्रेनचा समावेश आहे. ओमोरी प्रांताचे गव्हर्नर सोईचिरो मियाशिता यांनी सांगितले. बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद आहेत. अनेक मदत करणारी वाहने जागोजागी अडकून पडली आहेत. तरीही अग्निशमन गाड्या आणि रुग्णवाहिकांना मार्गक्रमण करता यावे, यासाठी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 

Related Articles