E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
इस्रायलच्या गोळीबारात गाझा १७ पॅलेस्टिनींचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
04 Feb 2026
डेअर अल बलाह : गाझा पट्टीत इस्रायलच्या गोळीबारात १७ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये महिला आणि मुलाची संख्या अधिक आहे. या संदभांतील माहिती बुधवारी रुग्णालयातील अधिकार्यांनी दिली.
संघर्षबंदी लागू झाल्यानंतर इस्रायलकडून गाझात हल्ले केले जात आहेत. मात्र, प्रथमच पॅलेस्टिनी नागरिक मोठ्या संख्येने ठार होण्याची घटना घडली आहे. १० ऑक्टोबर २०२५ मध्ये हमास आणि इस्रायल यांच्यात संघर्षबंदी झाली होती. यानंतर हवाई आणि हल्ले गोळीबारात ५३० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकच्या पुढाकाराने संघर्षबंदी झाली असली तरी नागरिकांचे मृत्यू थांबलेले नाहीत. त्यामुळे युद्ध थांबलेले नाही, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. संचारबंदीचा करार झाल्यानंतरही गाझा पट्टीत वांशिक हत्यांकांड सुरूच असल्याचा आरोप शिफा रुग्णालयाचे संचालक डॉ. महमद अबू सेलिमिया यांनी केला. संघर्षबंदी कुठे आहे ?, ती करणारे मध्यस्थ ़कुठे आहेत ? असा प्रश्नही त्यांनी विचारला. मध्यस्थ इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध करतात. पण, इस्रायलचे लष्कर हमास दहशतवादी हल्ले करुन संघर्षबंदी कराराचे उल्लंघन करत असल्याचा आरोप करत आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला आम्ही केवळ उत्तर देत आहोत, असे ते सांगत असल्याचे ते म्हणाले.
Related
Articles
नामिबियाला हरवत भारत गुणतालिकेत अव्वल
13 Feb 2026
जंतनिर्मूलन गोळ्यामुळे १२० विद्यार्थी आजारी
12 Feb 2026
पीएमश्री योजनेत महापालिकेच्या दोन शाळांची निवड
09 Feb 2026
बिहारमध्ये न्यायालयांना बॉम्बची धमकी
09 Feb 2026
भारत आणि थायलंडच्या हवाई दलाचा संयुक्त सराव
12 Feb 2026
सीतेच्या शोधात संकटांची मालिका
09 Feb 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सोने-चांदी घसरणार?
2
प्रशासन पोखरणारे ‘उंदीर’
3
स्थिती ‘जैसे थे’राखण्याचा प्रयत्न
4
डिजिटल युगातील घातक आव्हान
5
नाते जन्माचे
6
‘आयपीओ’चे मृगजळ