E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी
Samruddhi Dhayagude
04 Feb 2026
उपमहापौरपदी गजानन मगदूम बिनविरोध
गटबाजीमुळे अर्ज न भरण्याची काँग्रेसवर नामुष्की
सांगली : अपेक्षेप्रमाणे काँग्रेस पक्षाने 18 जणांचे संख्याबळ असतानाही अंतर्गत गटबाजीमुळे चक्क उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे महापौर म्हणून भारतीय जनता पक्षाचे धीरज सूर्यवंशी यांची तर उपमहापौर पदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गजानन मगदूम यांची बिनविरोध निवड झाली. याची औपचारिक घोषणा येत्या 10 फेब्रुवारी रोजी होणार्या विशेष महासभेत होणार आहे.
सांगली मिरज कुपवाड महापालिकेत काँग्रेसचे 18 नगरसेवक निवडून आलेले आहेत. निवडणुकीमध्ये भाजपा विरोधात अनेक उसने घेतलेल्या उमेदवारांमुळे पाडापाडीचे राजकारण झाले आणि भारतीय जनता पक्षाला काठावरचे बहुमत मिळाले. मात्र काँग्रेसमधील दोन अंतर्गत गटातील संघर्षामुळे काँग्रेस पक्ष ना विरोधी पक्ष नेता निवडू शकला ना महापौर पदासाठी उमेदवार अर्ज भरू शकला. याबाबत काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची बैठक खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत झाली, मात्र या बैठकीत केवळ चर्चा झाली. तोपर्यंत दुपारी तीन वाजून गेले. यामुळे वेळेत काँग्रेस पक्षाकडून अर्ज न आल्याने महापौरपदी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांची, तर उपमहापौरपदी गजानन मगदूम यांची बिनविरोध निवड झाली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपकडून अपेक्षेप्रमाणे धीरज सूर्यवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मगदूम यांचे नाव जाहीर करण्यात आले. दोन्ही सदस्यांनी आज महापौर उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले.
सांगली मिरज आणि कपवाड शहर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक 10 फेब्रुवारी रोजी होत आहे. यासाठी आज अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत होती. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडून महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांच्या नावाची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली. तसेच उपमहापौरपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देण्यात येणार आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन मगदूम यांचे नाव जाहीर करण्यात आले.
यावेळी आमदार सुरेश खाडे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी आमदार दिनकर पाटील आणि नितीन शिंदे, किसान मोर्चाचे प्रदेश संघटक पृथ्वीराज पवार, दीपक शिंदे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी यांचे अनुक्रमे महापौर आणि उपमहापौर पदाचे अर्ज आज भरण्याचा निर्णय झाला. भाजपच्या स्थानिक कोअर कमिटीने धीरज सूर्यवंशी यांचे नाव एकमताने निश्चित केले. त्यांचे नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे संमतीसाठी पाठवण्यात आले. काल सकाळीच त्यांची संमती आली आणि धीरज सूर्यवंशी यांचे नाव निश्चित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसने उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम यांचे नाव निश्चित केले.
सव्वा वर्षाचा फॉर्म्युला
महापौर पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा-दहा महिन्यांचा कालावधी न करता दोन टप्पे करावेत असे सुचवले आहे. त्यानुसार सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेत सव्वा वर्षांचे दोन टप्पे केले जातील असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. दुसर्या टप्प्यात कोणाची वर्णी लागणार हे त्यावेळी ठरेल असेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेलाही सोबत घेणार
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन सदस्य असून त्यांनाही सोबत घेणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र त्यांना सत्तेत काय द्यायचे हे निश्चित नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोबत येण्यास तयार असल्यास त्यांनाही घेऊ असे ते म्हणाले. त्यामुळे महापालिकेत सध्या भाजपचे 39, राष्ट्रवादी काँग्रेसचे 16 आणि शिवसेनेचे दोन असे 57 सदस्य महायुतीचे आहेत. शरद पवार गट सामील झाल्यास हे संख्याबळ साठवर जाईल असे ते म्हणाले.
पक्षाचे शल्य दूर करण्याचा प्रयत्न
धीरज सूर्यवंशी यांना गेल्या टर्ममध्ये उपमहापौर तसेच स्थायी समिती सभापतीपद दिले असताना, पुन्हा महापौर पदासाठी का निवडले याबाबत बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, गेल्या वेळी महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षातल्या सहा जणांनी बंडाळी केल्याने पक्षाचे अधिकृत उमेदवार असताना पडले. त्याचे शल्य पक्षाला होते. त्यामुळे त्यांना संधी दिली आहे. स्थायी समिती तसेच इतर समिती सभापती निवडी याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही, त्याला थोडा वेळ लागेल. महापौर, उपमहापौर निवडीनंतर पाच दिवसांनी विशेष सभा बोलण्यात येईल त्यामध्ये या निवडी होतील असे ते म्हणावे.
दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम यांची नावे जाहीर केल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी महापालिकेत जाऊन अर्ज दाखल केले. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, श्रीमती जयश्री पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आदी उपस्थित होते.
Related
Articles
केवळ उद्योगांवर भर...?
08 Feb 2026
शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली माहिती
09 Feb 2026
नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य द्या, आढावा बैठकीत महापौरांच्या सूचना
11 Feb 2026
दुहेरी सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर थरारक विजय
12 Feb 2026
निर्देशांक ८४ हजारांवर
10 Feb 2026
सोलापुरात भाजपची एकहाती सत्ता!
10 Feb 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सोने-चांदी घसरणार?
2
प्रशासन पोखरणारे ‘उंदीर’
3
स्थिती ‘जैसे थे’राखण्याचा प्रयत्न
4
डिजिटल युगातील घातक आव्हान
5
नाते जन्माचे
6
सायबर गुन्हेगारीचे अदृश्य जाळे