E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
नियंत्रण सुटल्याने आडोशी बोगद्याच्या तोंडाशी टँकर उलटला
Samruddhi Dhayagude
04 Feb 2026
मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक ठप्प; पर्यायी मार्ग कोणते ?
पुणे : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या गंभीर अपघाताने प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. अत्यंत ज्वलनशील प्रोपलीन गॅस वाहतूक करणारा टँकर बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ उलटल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला. अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्काळ थांबविण्यात आली. परिणामी द्रुतगती मार्गावर भीतीचे वातावरण पसरले. महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता. वाहतूक २२ तासांपासून ठप्प आहे.
टँकर थेट बोगद्याच्या तोंडाशी उलटला
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर टँकर पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होता. आडोशी बोगद्याजवळील अवघड वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकर थेट बोगद्याच्या तोंडाशी उलटला. अपघातानंतर काही वेळातच टँकरमधून प्रोपलीन गॅसची गळती सुरू झाली. हा गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने कोणताही अपघात किंवा ठिणगी मोठ्या स्फोटाला कारणीभूत ठरू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आयआरबी, देवदूत यंत्रणा, हेल्प फाउंडेशनची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. खोपोली येथील अग्निशमन दलालाही बोलावण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली, तर पुणे मार्गिकेवरील एका लेनवरून रात्री बारानंतर मर्यादित स्वरूपात वाहतूक वळवण्यात आली. त्यामुळे बरेच तास अडकलेल्या वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला.
टँकर हटविणे धोकादायक
मात्र, अपघातानंतर बरेच तास उलटूनही गॅस गळती रोखण्यात प्रशासनाला यश आले नाही. तज्ञ पथक गळती थांबविण्याचे प्रयत्न करत असून परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात येईपर्यंत अपघातग्रस्त टँकर हटविणे धोकादायक मानले जात आहे. त्यामुळे आडोशी बोगदा परिसरातील मुंबई मार्गिका अद्याप बंद ठेवण्यात आली आहे. बोरघाट परिसरात वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू असून दोन्ही बाजूंनी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
द्रुतगती महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांनी जुन्या महामार्गाचा वापर करावा, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे. संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासन सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
मुंबई-पुणे महामार्ग वाहतूक बदल करण्यात आलेले आहेत. आडोशी बोगद्याजवळील गॅस गळतीच्या घटनेमुळे महामार्ग आणि जुना महामार्ग दोन्ही ठप्प आहेत. प्रवाशांनी कृपया खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. कृपया लोणावळा-खंडाळा मार्ग पूर्णपणे टाळावा. प्रवासाचा वेळ ३-५ तासांनी वाढू शकतो, त्यामुळे पुरेसे इंधन आणि पाणी सोबत ठेवावे, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले.
१. ताम्हिणी घाट मार्ग: पुणे → पौड → ताम्हिणी घाट → माणगाव → मुंबई. (दक्षिण मुंबईसाठी उपयुक्त)
२. माळशेज घाट मार्ग: पुणे → चाकण → नारायणगाव → माळशेज घाट → कल्याण/ठाणे. (उपनगरांसाठी उपयुक्त)
Related
Articles
अंगणवाडी सेविकांचे राष्ट्रीय अधिवेशन पुण्यात
12 Feb 2026
पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना भारताचा पाठिंबा
09 Feb 2026
पुण्यात टेम्पोतून घसरलेल्या लोखंडी सळ्या कारमध्ये घुसल्या; चालक थोडक्यात बचावला
09 Feb 2026
नांदेडच्या महापौरपदी कविता मुळे यांची निवड
11 Feb 2026
नरवणे यांच्या पुस्तकाला मोदी घाबरले
09 Feb 2026
भारताचे अमेरिकेला 162 धावांचे आव्हान
08 Feb 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सोने-चांदी घसरणार?
2
प्रशासन पोखरणारे ‘उंदीर’
3
स्थिती ‘जैसे थे’राखण्याचा प्रयत्न
4
डिजिटल युगातील घातक आव्हान
5
नाते जन्माचे
6
‘आयपीओ’चे मृगजळ